पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किंम जोंग इल च्या दहाव्या पुण्यातिथीनिमित्त देशात लोकांनी हसू नये असा फतवा काढला आहे. हा फतवा ११ दिवसांसाठी लागू केला आहे. या ११ दिवसांत लोक हसू शकणार नाहीत आणि मद्यपानही करू शकणार नाहीत.
सरकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या फतव्यात किंम जोंग इल याच्या निधनाला १० वर्षे पूर्ण होत असल्याने कुठल्याही प्रकारचा आनंद व्यक्त करण्यावर बंदी घातली आहे. किम जोंग इलने १९९४ ते २०११ पर्यंत उत्तर कोरियावर हुकूम गाजवला.
किंम जोंग इलच्या मृत्यूनंतर त्याचा तिसरा आणि सर्वात लहान मुलगा किंग जोंग हा हुकूमशहा बनला. त्याने सत्ता सांभाळ्याच्या घटनेला १० वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, सूत्रे स्वीकारल्याचा कोणताही आनंद पुढील ११ दिवस साजरा करू नये. तसेच लोकांनी ११ दिवस शोक व्यक्त करावा, असा आदेश दिला. या दरम्यान कुणी हसू नये याशिवाय मद्यपान करून आनंद व्यक्त करू नये. रेडियो फ्री एशियाशी बोलताना सिनुइजू शहराचे निवासी अधिकाऱ्याने हा फतवा जारी केला. पुढील ११ दिवस लोकांनी मद्यपान करू नये, हसू नये किंवा त्यासारखे हावभाव करू नये.
किंग जोंग इलचा मृत्यू १७ डिसेंबर रोजी झाला होता. आज बाजारात कुणीही सामान खरेदीसाठी जाणार नाही. ज्या ज्या वेळी उत्तर कोरियात शोक व्यक्त करण्यात आला त्यावेळी जे लोक दारू पितांना आढळले अथवा आनंद व्यक्त करताना सापडले त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कच्चे कैदी समजून शिक्षाही दिली. अधिकारी त्यांना पकडून घेऊन गेले त्यानंतर हे लोक पुन्हा कधीच दिसले नाहीत. दुखवट्याच्या काळात जर कुणाचा मृत्यू होत असेल तर त्यांना रडण्याचीही मुभा नाही. शिवाय जोपर्यंत दुखवटा संपत नाही तोपर्यंत पार्थिव बाहेर नेऊ शकत नाही.
नागरिकांच्या दु:खावर पोलिसांचा पहारा
दुखवट्यादरम्यान लोक वाढदिवस साजरा करू शकत नाहीत. लोकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी तैनात केले आहेत. लोक दु:खी आहेत की नाही याची तपासणी हे अधिकारी करतील. उत्तर कोरियाचा क्रूर हुकूमशहा अशी ओळख असलेल्या जोंग इलचा ६९ व्या वर्षी ह्रदयविकारच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यावेळी त्याच्या अंत्ययात्रेवेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शोक व्यक्त करावा असा फतवा काढला होता. त्यामुळे लोकांमध्ये रडण्यासाठी चढाओढ लागली होती. आता त्याच्या मृत्यूला १० वर्षे पुर्ण झाल्याने आता दुखवटा पाळण्यासाठी ११ दिवसांचे निर्बंध लादले आहेत.
हेही वाचा: