Singapore Coronavirus : सिंगापूर हादरले! आढळले कोरोनाचे नवीन 25 हजार रूग्ण

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंगापूरमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. 5 ते 11 मे दरम्यान देशात 25,900 हून अधिक कोरोनाचे नवीन रूग्ण आढळले आहेत. सिंगापूरचे आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी शनिवारी (दि.18) देशवासीयांना पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला. ते म्हणाला, 'आपण कोरोनाच्या नव्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या दोन-चार आठवड्यांत ही लाट शिगेला पोहोचू शकते. सध्या कोणत्याही प्रकारची सामाजिक बंधने लागू करण्याची आवश्यकता नाही.

रुग्णांची संख्या वाढली

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 5 ते 11 मे दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 25,900 वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात ही संख्या 13,700 इतकी होती. एका आठवड्यात 181 रूग्ण आढळत होते. ही संख्या 250 पर्यंत वाढली आहे. आयसीयूमध्ये दररोज येणाऱ्या रूग्णांची वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक रुग्णालयांना अत्यावश्यक रुग्णालयातील बेड राखण्यासाठी सांगितले आहेत. यासोबतच योग्य रुग्णांना मोबाईल इन पेशंट केअर ॲट होमद्वारे घरी पाठविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे सिंगापूरचे पर्यायी आंतररुग्ण मॉडेल आहे जे रूग्णांना हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये न ठेवता त्यांच्या स्वतःच्या घरी दाखल करण्याचा पर्याय देते.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्र्यांनी केले आवाहान

आरोग्य मंत्री ओंग यांनी गंभीर आजाराचा धोका असलेल्या लोकांना गेल्या 12 महिन्यांत कोविड-19 लसीचा अतिरिक्त डोस न मिळाल्यास अतिरिक्त डोस घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news