ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर ४ भारतीयांचा बुडून मृत्यू

ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर ४ भारतीयांचा बुडून मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील फिलिप बेट समुद्रकिनाऱ्यावर चार भारतीयांचा बुडून मृत्यू झाला, असे कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी एका निवेदनात म्हटले आहे. तीन महिला आणि एका पुरूषाचा मृतांमध्ये समावेश आहे. २५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितले.

व्हिक्टोरियाच्या फिलिप बेटाच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील फॉरेस्ट लेण्यांजवळ ही घटना घडली. द गार्डियनच्या वृत्तानुसार, मृत तीनपैकी दोन महिला २० वर्षांच्या आहेत. तर पुरुष ४० वर्षांचा आहे. गस्त नसलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर चौघेजण पोहत असताना बुडाले. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौथ्या व्यक्तीला मेलबर्नच्या अल्फ्रेड हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news