पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये पाकिस्तानमध्ये सुमारे 50 किलोमीटर आत घुसून बलुच दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याची पाकिस्तानच्या लष्कराला पूर्वकल्पना होती. मात्र या हल्ल्याची माहिती गोपनीय ठेवावी, अशी सूचना करण्यात आली नव्हती, असा दावा इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) निकटवर्ती अशी ओळख असणार्या एका टेलिग्राम चॅनेलने या हल्ल्यांबाबत नवा दावा केला आहे. ( Iran missile attack on pakistan )
इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या जवळच्या मानल्या जाणार्या टेलिग्राम चॅनेलने 18 जानेवारी रोजीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, " इराण बलुचिस्तानमध्ये हवाई हल्ला करणार ही पाकिस्तानच्या लष्कराला पूर्वकल्पना होती. मात्र या हल्ल्याची माहिती गोपनीय ठेवावी, अशी सूचना करण्यात आली नव्हती. पाकिस्तानमधील दहशतवादी लक्ष्यांवर झालेल्या हल्ल्यासाठी पाकिस्तान सरकारशी समन्वय आवश्यक आहे. इराणने बलुचिस्तानमध्ये केलेला हल्ला हा सीमावर्ती दहशतवादाशी लढा देण्यासाठी आणि सीमेवर कायमस्वरूपी सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या दोन्ही देशांच्या दृढनिश्चयाचा परिणाम आहे." ( Iran missile attack on pakistan )
टेलिग्राम चॅनेलच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, इराणच्या अध्यक्षाचे प्रतिनिधी हसन काझेमी-कोमी यांच्या अलीकडील पाकिस्तान भेटीचा हेतू इस्लामाबादला येऊ घातलेल्या इराणी हल्ल्याबद्दल आगाऊ माहिती देण्याच्या उद्देशाने असू शकतो. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून या भागात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली आहे.
इराणच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले. इराणमधील हवाई हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवार, १८ जानेवारी रोजी केला होता. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात 9 'दहशतवादी' मारले गेल्याचे म्हटले होते. इराणने बलुचिस्तानमध्ये हवाई हल्ला केला होता. इराणच्या हवाई हल्ल्यात दोन मुले ठार तर तीन जण जखमी झाले. पाकिस्तानने परराष्ट्र मंत्रालयात इराणच्या प्रभारी राजदूताला बोलावून 'त्याच्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाचा' तीव्र निषेध केला होता.
हेही वाचा :