
पुढारी ऑनलाईन डेस्क : गतवर्षीच्या स्मरणीय स्मृतींना पुन्हा उजाळा देत आणि कटू आठवणी विसरुन सारे जण नव्या आकांक्षा…नवे संकल्प करत नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येणारे नवे वर्ष जगासाठी खास ठरणार आहे. ( 2024 Important Event ) जाणून घेवूया नववर्षातील आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणार्या माेठ्या घडामाेडींविषयी…
बिल गेट्स फाउंडेशन एका औषधावर काम करत आहे, ज्यामुळे कुपोषण संपेल. कुपोषण दूर करण्यासाठी औषधावर स्टेज-3 चाचण्या घेण्यात येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून २०२४ या वर्षात हे औषध वापरण्याची परवानगी मिळाली आहे. भारतातील ४३ लाखांहून अधिक मुले कुपोषणाचे बळी आहेत. भारतालाही या औषधाचा मोठा फायदा होणार आहे.
२०२४ या वर्षात अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा; आपले ४ अंतराळवीर चंद्रावर पाठवणार आहे. यापूर्वी १९७२ मध्ये नासाने अपोलो-17 मोहिमेत दोन अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले होते. आता ५२ वर्षांनंतर मानवाला चंद्रावर पाठवले जात आहे. नासाचे अंतराळवीर चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परततील.
युरोपातील पहिला एक्स-स्केल सुपर कॉम्प्युटर २०२४ मध्ये लॉन्च केला जाईल. जर्मनीतील ज्युलिच शहरातील नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये तो बसवण्यात येणार आहे. सुपर कॉम्प्युटर प्रत्येक सेकंदाला १० ते १८ पॉवरपर्यंत गणना करू शकतात.
क्लिपर मोहिमेसाठी आजपर्यंतचे सर्वात मोठे अंतराळयान तयार केले जात आहे. या अंतराळयानाचे वजन इंधनाशिवाय ३२४१ किलो असेल. या अंतराळयानाची लांबी बास्केटबॉलच्या मैदानाएवढी म्हणजेच ३० मीटर असेल. गुरु ग्रह मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या या यानावर २४ इंजिने असतील.
२०२४ मध्ये पॅरिस शहरात संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा होतील. पॅरीस शहरात तिसर्यांदा ऑलिम्पिक खेळ होणार आहेत. आत्तापर्यंत लंडन हे एकमेव शहर आहे जिथे तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या आहेत. १९२४ मध्ये पॅरिस येथे पहिल्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. २०२४ मध्ये पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सुमारे ७६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये 306 स्पर्धा होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 'ब्रेक डान्स' स्पर्धाही पाहायला मिळणार आहेत.
२०२४ मध्येअंतराळात चित्रपट स्टुडिओ दिसतील. या स्पेस स्टुडिओचे नाव SEE-1 असे असेल. डिसेंबर २०२४ मध्ये स्टुडिओ तयार होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर या स्टुडिओमध्ये काम सुरू होईल. या स्टुडिओमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण जमिनीपासून 250 मीटर उंचीवर होणार आहे. कलाकारांसोबतच प्रेक्षकांसाठीही हा एक वेगळा अनुभव असणार आहे.
२०२४ मध्ये व्हिक्टर ग्लोव्हर हा चंद्रावर जाणारा पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती ठरणार आहे. तर ख्रिस्तियाना कोच ही चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरणार आहे. ख्रिस्तियाना कोच यांना मिशन स्पेशालिस्ट मानले जाते. चंद्रावर जाणारे हे यान केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले जाणार आहे.
हेही वाचा :