पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेले चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे. मार्चमध्ये संरक्षण मंत्री झालेले ली 29 ऑगस्ट रोजी भाषण दिल्यानंतर गायब हाेते. नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने माजी परराष्ट्र मंत्री किन गँग यांना राज्य काउंसिलर पदावरून हटवण्यासही मतदान केले. यासोबतच चीनने आणखी दोन मंत्र्यांवर कारवाई केली आहे. (China)
एका वृत्तानुसार, संरक्षण मंत्री ली शांगफू हे २९ ऑगस्ट २०२३ रोजी सार्वजनिकरित्या दिसले होते. चीन-आफ्रिका पीस अँड सिक्युरिटी फोरमला त्यांनी संबोधित केले हाेते. यापूर्वी ते रशियातील सुरक्षा परिषदेतही उपस्थित होते. रशियासोबतच्या बैठकीदरम्यान शांगफू यांनी अमेरिकेवरही निशाणा साधला होता. ली शांगफू यांची मार्च २०२३ मध्ये संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना मध्ये स्टेट कौन्सिलर पदही भूषवले आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या हार्डवेअर खरेदीशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच ली शांगफू बेपत्ता झाले आहेत. जुलैमध्ये हा तपास सुरू करण्यात आला होता. चिनी लष्कराचे म्हणणे आहे की ते ऑक्टोबर २०१७ पासून या मुद्द्यांचा तपास करत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपाेर्टनुसार,ली शांगफू हे सप्टेंबर २०१७ ते २०२२ पर्यंत उपकरण विभागात कार्यरत होते. मात्र, त्याच्यावर कोणतेही आरोप नाहीत.
एका मिडियाच्या अहवालानुसार, या वर्षी जुलैमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, त्याच्या बडतर्फीचे कारण सांगण्यात आले नाही. गँग हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळचे मानले जात होते. किन गँग यांची परराष्ट्र मंत्री आणि राज्य समुपदेशक या पदावर वेगाने घाईने झाल्याचे बोलले जात होते; पण आता त्यांचे गूढ बेपत्ता होणेही तितकेच चर्चेस ठरले आहे. किन गँग यांना पदावरून हटवल्यानंतर रॉकेट फोर्सचे प्रमुख जनरल ली युचाओ आणि जनरल लिऊ गुआंगबिन यांनाही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पदावरून हटवले. हे दोन्ही अधिकारीही अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. या सर्वांची नियुक्ती चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली होती.
अमेरिकेने ली शांगफू यांच्यावर बंदी घातली आहे. रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदीवर देखरेख ठेवण्याबाबत अमेरिकेने ही कारवाई केली आहे. निर्बंध लादले. त्यामुळे ते अमेरिकेत येऊ शकत नाही. चीनने अमेरिकन लष्कराशी संपर्क तोडला आहे. याशिवाय अमेरिकेने तैवानला शस्त्रे दिल्यानेही चीन आणि अमेरिका संबध बिघडले आहेत. चीनने अमेरिकेचे निर्बंध स्वीकारलेले नाहीत. याशिवाय ली यांच्यावरील हे निर्बंध हटवावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनने अर्थमंत्री लिऊ कुन यांनाही हटवले आहे. त्यांच्या जागी लॅन फोन यांची नियुक्ती करण्यात आली. कोणतेही स्पष्टीकरण न देता बदली झालेले लिऊ हे तिसरे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आहेत.
हेही वाचा