Shia Muslims in Pakistan | पाकमधील शिया मुस्लिमांना भारतामध्ये यायचेय!

Shia Muslims in Pakistan | पाकमधील शिया मुस्लिमांना भारतामध्ये यायचेय!
Published on
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तानने अनधिकृतपणे ताब्यात घेतलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सध्या गृहयुद्धसद़ृश स्थिती आहे. पाकमध्ये एकुणात अल्पसंख्याक असलेल्या शिया मुस्लिमांची संख्या गिलगिट-बाल्टिस्तानात लक्षणीय आहे. या समुदायाने कट्टरवादी सुन्नी संघटना व पाकिस्तानी लष्कराच्या दडपशाहीविरुद्ध बंड पुकारले असून, आम्हाला भारतात जायचे आहे, त्यासाठी कारगिल हायवे खुला करा, अशी मागणी केली आहे. (Shia Muslims in Pakistan)

शिया मुस्लिमांनी लष्कराविरुद्ध उठाव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय वास्तविक नियंत्रण रेषेपासून 90 किलोमीटरवर स्कर्दू नावाचे शहर आहे. स्कर्दूतील बहुसंख्य शिया मुस्लिम भारताकडे जाणारा कारगिल महामार्ग खुला करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. शिया मुस्लिमांना आता पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये राहायचे नाही, भारतात जायचे आहे.

गिलगिट-बाल्टिस्तानात 8 लाखांवर शिया मुस्लिम आहेत. शियांच्या आंदोलनाची तीव्रता पाहता पाकिस्तानी लष्कराने 20 हजार अतिरिक्त सैनिक इथे तैनात केले आहेत. या तैनातीसह जमावबंदीचा आदेश जारी असूनही स्कर्दू, हुंजा, दियामीर आणि चिलासमध्ये शिया संघटनांची निदर्शने सुरू आहेत. सरकारने मोबाईलसह इंटरनेट बंद केले आहे. याउपर शिया आंदोलन शमण्याची स्थिती नसल्याने लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी इस्लामाबादहून चार मुस्लिम उलेमांना गिलगिटला पाठवले आहे. आता खूप उशीर झालेला आहे. आम्ही माघार घेणारच नाही, अशी शिया मुस्लिमांची त्यावर प्रतिक्रिया आहे.

बंडाचे निमित्त काय?

  •  इस्लाम, अल्लाह, कुराण, पैगंबर यांची निंदा केल्यास कारावास ते मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या ब्लास्फेमी कायद्याचा विस्तार करणारे विधेयक पाक सरकारने मंजूर केले.
  • नव्या दुरुस्तीनुसार अल्लाह, कुराण, प्रेषितांसह आता सहाबांवरील (प्रेषितांच्या सहवासात राहिलेले लोक) टीकाही पाकिस्तानने या कायद्याच्या कक्षेत आणली आणि विस्तारित कायद्यान्वये गिलगिट-बाल्टिस्तानातील शिया धर्मगुरू आगा बाकिर अल-हुसैनी यांना अटक केली आणि शिया रस्त्यावर उतरले.

ये जो दहशतगर्दी है, उसकी वजह वर्दी है!

दहशतवादाला पाकिस्तानी लष्कराकडूनच अभयदान आहे, असा उघड आरोप शिया मुस्लिम आंदोलकांनी केला आहे. ये जो दहशतगर्दी (दहशतवाद) है, उस की वजह वर्दी (लष्कर) हैं, अशा घोषणा शिया मुस्लिम देत आहेत. (Shia Muslims in Pakistan)

बंडाचे मूळ काय?

गिलगिट-बाल्टिस्तानात पूर्वी शिया सर्वाधिक संख्येने होते. लष्कराने येथे सुन्नी मुस्लिमांना आणून वसवले. शियांची संख्या त्यामुळे रोडावत गेली. आता 40 टक्के शिया या भागात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news