टोकियो; वृत्तसंस्था : जपानने 'स्लिम' लँडर ही चांद्रमोहीम जाहीर केली आहे. 28 ऑगस्टलाच प्रक्षेपण होणार होते; पण पुढे ढकलले आहे. 'जाक्सा' या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेतर्फे लवकरच प्रक्षेपणाची नवी तारीख ठरेल. (Slim Lander)
भारताच्या 'चांद्रयान-3'च्या यशानंतर आता जगाचे लक्ष जपानच्या 'स्लिम' लँडरकडे आहे. रडारने सज्ज 'स्लिम' लँडरही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. मोहीम यशस्वी झाल्यास दक्षिण ध्रुवावर उतरणारा जपान हा जगातील दुसरा देश ठरेल. भारत हा असे करून दाखविणारा पहिला देश आहे. (Slim Lander)
'स्लिम' म्हणजे 'स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून' होय. लँडरचे वजन 200 किलो आहे. लांबी 2.4 मीटर आणि रुंदी 2.7 मीटर आहे. यामध्ये सर्वोत्तम रडार, लेसर रेंज फाईंडर आणि व्हिजन आधारित नेव्हिगेशन सिस्टीम आहे. तळहातावर ठेवता येईल, असा एक रोबोही सोबत आहे.
हेही वाचा;