इराक : कोविड-१९ वाॅर्डला लागलेल्या आगीत ५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

इराकच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत ५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू
इराकच्या रुग्णालयाला लागलेल्या आगीत ५४ कोरोना रुग्णांचा मृत्यू
Published on
Updated on

बगदाद, पुढारी ऑनलाईन : इराक देशात कोविड-१९ रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये मृत्यूंची संख्या ही ५४ झालेली आहे. ही आग इराक देशातील नसरिया स्थित इमाम हुसैन या रुग्णालयाला लागली होती. रुग्णालयाच्या ज्या वाॅर्डमध्ये ही आग लागली होती वाॅर्ड कोविड-१९ चा होता.

इराकच्या दक्षिण प्रांताधिकारीच्या आरोग्य खात्याकडून यांच्याकडून सांगण्यात आले की, रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत ५४ लोकांचा मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाला लागलेली आग ही ऑक्सिजन टॅंकच्या सोफ्टाने झालेला आहे.

असं सांगितलं जात आहे की, ज्या वाॅर्डमध्ये ही आग लागली. त्यामध्ये कोरोना संक्रमित रुग्ण फसलेले होते. प्रशासनाकडून मृतांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रात्री उशीरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.

आरोग्य मंत्री हैदर अली जमीली यांच्या मते या वाॅर्डमध्ये सध्या ६० रुग्ण अडकलेले आहेत. या घटनेनंतर काही लोकांनी रुग्णालयाच्या बाहेर निषेध केला आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना, अशी मागणी करण्यात आली.

इराक संसदेचे सदस्य मोहम्मद अल हलबौसी यांनी ट्वीट केले आहे की, "या घटनेतून हे स्पष्ट होतं की, इराक नागरिकांचे संरक्षण व्यवस्थित होत नाही." अशी एक घटना एप्रिलमध्ये घडलेली होती, त्यात ८२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्री हैदर अली जमीली यांनी राजीनामा दिला होता.

युद्धाच्या छायेत असणाऱ्या इराकमध्ये कोरोना संक्रमणाची समच्या आता गंभीर झालेली आहे. इराकमध्ये आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ८ हजार ५११ कोरोना बाधितांची संख्या आहे. १७ हजार ५९२ लोकांचा कोरोना मृत्यू झालेला आहे. तर, १ कोटी ३१ लाख ३ हजार ५५२ लोक आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले आहेत.

पहा व्हिडीओ : कोरोना आणि आरोग्य

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news