रशिया चा अमेरिकेवर पुन्हा सायबर हल्ला! - पुढारी

रशिया चा अमेरिकेवर पुन्हा सायबर हल्ला!

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इशारा देऊनही अमेरिकन कंपन्यांवरील रशिया चे सायबर हल्ले थांबलेले नाहीत. अमेरिकन सायबर तज्ज्ञांनी रशियन गुप्‍तचर यंत्रणेच्या एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल माहिती जाहीर केली.

अमेरिकन तज्ज्ञांनी सर्व शासकीय विभाग, कॉर्पोरेट, कॉम्प्युटर नेटवर्कसह मायक्रोसॉफ्टच्या अधिकार्‍यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमेरिकन सायबर तज्ज्ञांच्या मते रशिया तील सरकार प्रायोजित नोबेलियम या सायबर संस्थेने अमेरिकेतील 140 आयटी कंपन्यांना आपले लक्ष्य केले आहे. अमेरिकन सरकारकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी रशियातून झालेल्या अशाच एका सायबर हल्ल्यानंतर जो बायडेन यांनी रशियावर अनेक निर्बंध घातले होते.

यापूर्वी रशियन गुप्तचर यंत्रणेने 2016 मधील अमेरिकन निवडणुकीपूर्वी सायबर हल्ला केला होता. नंतर 10 मे 2021 रोजी अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तेल पाईपलाईन कंपनीवर डार्कसाईड नावाच्या सायबर गुंडांच्या टोळीने हल्ला केला होता.

Back to top button