अरुसा आलम म्हणतात, अमरिंदर सिंग यांच्याशी मैत्रीचे नाते  - पुढारी

अरुसा आलम म्हणतात, अमरिंदर सिंग यांच्याशी मैत्रीचे नाते 

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतंत्र पक्ष स्थापून भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर, प्रदेश काँग्रेस आणि राज्य सरकारने त्यांच्या विरोधातील संघर्ष तीव्र केला आहे.

अमरिंदर यांच्या पाकिस्तानी पत्रकार मैत्रिणीचे पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’शी संबंध असल्याचा दावा करत पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर रंधवा यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. आरोपांनंतर अमरिंदर सिंग यांच्याकडूनही तत्काळ प्रत्युत्तर दिले होते, तर अरुसा आलम यांनीही याप्रकरणी मौन सोडले असून, त्यांनी त्यांच्या आणि अमरिंदर सिंग यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे.

माझे कॅप्टन साहेबांशी माणुसकीचे नाते आहे. मी त्यांची खूप चांगली मैत्रीण आहे, याचा मला खूप अभिमान आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. आमच्या नात्यावर टीका करणारे आणि प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे लोक नैतिकतेच्या बाबतीत सिंग यांच्या जवळही जाऊ शकत नाही, अशी टीका अरुसा आलम यांनी केली.

Back to top button