अफगाणिस्तानात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

दिल्लीपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले
Mild Earthquake
अफगाणिस्तानात ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी (दि.२९) रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भुकंपाचे धक्के जाणवताच  लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन ते घराबाहेर पडले. भुकंपाचे केंद्र केंद्र अफगाणिस्तानात होते. अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (दि.२९) झालेल्या जोरदार भूकंपाचा प्रभाव एनसीआरपर्यंत पसरल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ इतकी नोंदवण्यात आली आहे.

अफगाणिस्तानच्या वेळेनुसार सकाळी ११.२६ वाजता भूकंप झाला, ज्याचा प्रभाव दिल्लीपर्यंत दिसून आला. भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलपासून हाकेच्या अंतरावर होता. त्याची तीव्रता इतकी होती की एनसीआरमध्येही पृथ्वी हादरू लागली. आतापर्यंत या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.

अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

मात्र, भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. दोन आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ मोजली गेली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news