पुढारी ऑनलाइन डेस्क : Facebook Meta Layoff : फेसबुकची मूळ कंपनी मेटा लवकरच आणखी नोकरकपात करण्याच्या तयारीत आहे. पुढील काही महिन्यात टप्प्याटप्प्याने ही अतिरिक्त नोकर कपात करण्याची योजना कंपनीकडून आखली जात आहे. अमेरिकन मीडिया द वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) ने याबाबतचा अहवाल दिला आहे. त्याआधारे एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एएनआयने म्हटल्यानुसार, Facebook Meta Layoff : मेटा कंपनीतील काही परिचित लोकांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यात कंपनी अतिरिक्त नोकर कपातीची घोषणा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये करेल. ही कपात अंदाजे 13 टक्के इतकी असेल. म्हणजेच गेल्या वर्षी इतकीच ही कपात असणार आहे. त्यामुळे कंपनीतील 13 टक्के कर्मचा-यांच्या डोक्यावर सध्या नोकरी जाण्याची टांगती तलवार असणार आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, Facebook Meta Layoff : पुढील आठवड्यात नॉन इंजिनियरिंग क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील नोकरकपातीची घोषणा केली जाऊ शकते. तसेच काही प्रकल्प बंद करून त्याप्रकल्पात कार्यरत असणारी टीम देखील कट ऑफ करण्यात येऊ शकते.
Facebook Meta Layoff : मेटाने गेल्या वर्षी अंदाजे 11,000 नोकऱ्या किंवा सुमारे 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली. यावर्षी जे शिल्लक आहेत त्यांच्यामधून तेवढ्याच प्रमाणात नोकरकपात होण्याची शक्यता आहे. मात्र दुस-या तिमाहितील अपेक्षित संचीयी कपातीची अंतिम गणना अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घालण्यायोग्य (वेअरेबल डिव्हाइसेस) टेकनॉजीची उपकरणे जसे की स्मार्ट घड्याळ, एअरपॉड, इत्यादी विभागात कपात होऊ शकते. तसेच रिअॅलिटी लॅब्स, मेटाच्या हार्डवेअर आणि मेटाव्हर्स डिव्हिजनमध्ये काम करणारे लोक हे दीर्घकालीन संशोधनात असले तरीदेखील या प्रकल्पातील कर्मचा-यांवर नोकरकपातीची कु-हाड कोसळू शकते.
द वॉल स्ट्रीट जर्नलने नियोजित कपातीचा अहवाल दिल्यानंतर तासांनंतरच्या ट्रेडिंगमध्ये मेटा शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढले.
Facebook Meta Layoff : मेटा मुख्य वित्तीय अधिकारी सुसान ली यांनी गुरुवारी मॉर्गन स्टॅनले 2023 तंत्रज्ञान, मीडिया आणि दूरसंचार परिषदेत सांगतिले की, "आम्ही अॅप्स आणि रिअॅलिटी लॅब्स या दोन्ही फॅमिलीमध्ये संपूर्ण कंपनीकडे पाहत आहोत आणि खरोखरच आम्ही आमची संसाधने सर्वोच्च लाभाच्या संधींसाठी उपयोग करत आहोत का नाही याचे आम्ही सध्या मुल्यमापन करत आहोत."
मेटा मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग यांनी पूर्वी सांगितले होते की 2023 हे मेटामध्ये "कार्यक्षमतेचे वर्ष" असेल आणि काही प्रकल्प कंपनीत बंद होतील. ऑक्टोबरमध्ये झुकेरबर्गच्या अंदाजानुसार कंपनी 2023 चा शेवट करण्यासाठी त्यावेळी असलेल्या अंदाजे कर्मचार्यांसह कपात करण्यात येईल हे लक्षात घेता सततची कपात लक्षणीय आहे.
हे ही वाचा :