US shot down an object | चीनच्या स्पाय बलून नंतर अमेरिकेचा आणखी एक एअर स्ट्राइक, कारच्या आकाराची वस्तू केली नष्ट

US shot down an object | चीनच्या स्पाय बलून नंतर अमेरिकेचा आणखी एक एअर स्ट्राइक, कारच्या आकाराची वस्तू केली नष्ट
Published on
Updated on

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन; अमेरिकेच्या फायटर जेटने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर अलास्का येथे उंचावर उडणारी एक अनोळखी वस्तू (US shot down an object) खाली पाडली आहे. ही वस्तू एका छोट्या कारच्या आकाराची असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांच्या म्हणण्यानुसार, या वस्तूने नागरी हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. ही वस्तू अलास्काच्या किनारपट्टीजवळ गोठलेल्या पाण्यात पडली आहे आणि शक्य तितक्या लवकर त्याचे अवशेष गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याआधी हवेत घोंघावणारा चीनचा स्पाय बलून (हेरगिरी बलून) अमेरिकेने पाडला होता. त्यानंतर आठवड्यानंतर अमेरिकेने आणखी एक एअर स्ट्राइक करत उंचावर उडणारी एक वस्तू नष्ट केली आहे. हाय-अल्टीट्यूड फ्लाइंग ऑब्जेक्ट शुक्रवारी खाली पाडल्याबद्दल, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्सचे समन्वयक जॉन किर्बी यांनी म्हटले आहे, "संरक्षण विभाग गेली २४ तास अलास्का हवाई क्षेत्रात त्या वस्तूवर लक्ष ठेवून होता. ही वस्तू ४० हजार फूट उंचीवर उडत होती आणि यामुळे नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता."

"सावधगिरी बाळगून आणि पेंटागॉनच्या शिफारशीनुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी लष्कराला ती वस्तू खाली पाडण्याचे आदेश दिले आणि त्यांनी तसे केले. ही वस्तू आमच्या प्रादेशिक पाण्याच्या आत गोठलेल्या पाण्यात पडली आहे," असे त्यांनी सांगितले. यूएस नॉर्दर्न कमांडच्या लढाऊ विमानाने ही वस्तू खाली पाडली, असेही ते म्हणाले. ही वस्तू एका लहान कारच्या आकाराची होती. ही अत्यंत विरळ लोकसंख्येच्या क्षेत्रावर घोंघावर होती. जेव्हा ही वस्तू पाण्यावर घोंघावत होती त्यावेळी ती पाडण्याचे आदेश राष्ट्राध्यक्षांनी आदेश दिले, असे त्यांनी नमूद केले.

"ही वस्तू ज्याठिकाणी पडली आहे तेथील अवशेष चीनच्या स्पाय बलूनपेक्षा कमी असतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. आम्हाला माहित आहे की आम्ही गेल्या आठवड्यात पाडलेला चिनी बलून हा संवेदनशील लष्करी स्थळांवर पाळत ठेवत होता." असेही ते म्हणाले. (US shot down an object)

याआधी आठ दिवस चीनचा स्पाय बलून (हेरगिरी बलून) घोंघावत होता. या संकटावर हल्ला करून अमेरिकन हवाई दलाने तो नष्ट केला होता. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली होती. चीनने अमेरिकेच्या या कारवाईला तीव्र हरकत घेतली असून, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियमांचा, संकेतांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्हालाही आहे, असेही चीनने अमेरिकेला ठणकावले आहे.

बलून पाडण्यापूर्वी अमेरिकेने आपली तिन्ही विमानतळे बंद केली होती. चिनी बलून ६० हजार फुटांवर उडत असताना हवाई दलाच्या लँगले तळावरून अमेरिकेने मारा केला. बलूनचे अवशेष समुद्रात कोसळले होते.

बलूनच्या मदतीने चीनने अमेरिकेतील कुठली माहिती लांबविली, त्याचा शोध घेण्यासाठी पेंटॅगॉनने बलूनचे अवशेष समुद्राबाहेर काढण्यासाठी नौदल तसेच सागरी सीमा सुरक्षा दलाचे पथक रवाना केले होते. सर्वात आधी २८ जानेवारी रोजी चीनचा हा बलून अमेरिकन हवाई हद्दीत प्रवेश करताना दिसला होता. यानंतर तो मोटांना परिसरात आढळून आला होता.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news