शफिकेह अट्टाई या महिला उद्योजिकेचे तालिबान्यांना आव्हान | पुढारी

शफिकेह अट्टाई या महिला उद्योजिकेचे तालिबान्यांना आव्हान

काबूल ; वृत्तसंस्था : महिलांनी घराबाहेर कामधंदा करण्यावर तालिबानने बंदी घातली आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील रहिवासी शफिकेह अट्टाई या 40 वर्षीय अफगाण महिलेच्या कंपनीत तिच्यासह 1 हजारावर महिला कामगार आहेत. शफिकेह यांची कंपनी जगभरातील अनेक देशांत केसर निर्यात करते. सन 2007 मध्ये सुरू केलेल्या या कंपनीवर आता तालिबानचे सावट आहे. मात्र, शफिकेह अट्टाई यांनी अद्याप तालिबान्यांच्या धमक्यांना भीक घातलेली नाही.

इतर महिलांप्रमाणे मीही मरायला घाबरले असते तर तालिबान्यांच्या भीतीने काम सोडले असते; पण मी काम सोडले तर माझ्याकडे कामाला असलेल्या महिलांचे काय होणार. पुन्हा कंपनी उभी करायला मी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. माझी कंपनी महिलांनी महिलांसाठी उभा केलेला एक उद्योग आहे.

मालक महिला आहे, काम करणार्‍याही महिला आहेत. तालिबानी आम्हाला धमकावून कंपनी बंद पाडू शकणार नाहीत. तसे करण्याचा प्रयत्न झाला तर या अन्यायाविरुद्ध आम्ही त्यांचे कान भेदून टाकणारा आवाज उठवू.

बारा वर्षांपूर्वी केवळ अफूवर भर असल्याने देशात वर्षाला फक्त एक टन केसरचे उत्पादन होत होते. तालिबानी शासनात केसरचे उत्पादन पूर्ववत घटण्याचीच शक्यता अधिक आहे, असे जाणकारांचे मत आहे.

Back to top button