पाकिस्तानात पुलावरून बस कोसळली; 44 प्रवासी ठार | पुढारी

पाकिस्तानात पुलावरून बस कोसळली; 44 प्रवासी ठार

इस्लामाबाद :  पाकिस्तानातील बलुचिस्तानातील लसबेला जिल्ह्यात बस पुलावरून कोसळली आणि काही वेळातच बसने पेट घेतला. बसमधील 44 प्रवासी मरण पावले आहेत.

अपघात रविवार रात्री 2.15 वाजता झाला. बस क्वेटाहून कराचीला जात होती. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरील पिलरला धडकून खाली कोसळली. कोसळताच बसने पेट घेतला. सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नांती आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले. बचाव पथकाने एक महिला आणि एका मुलासह तीन जणांना वाचवले आहे.

Back to top button