Jerusalem Synagogue Shooting : जेरुसलेमच्या सिनेगॉगवर दहशतवादी हल्ला; ७ जण ठार | पुढारी

Jerusalem Synagogue Shooting : जेरुसलेमच्या सिनेगॉगवर दहशतवादी हल्ला; ७ जण ठार

जेरुसलेम; वृत्तसंस्था : इस्रायलमधील जेरुसलेमच्या याकोव्ह उपनगरातील सिनेगॉगमध्ये (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) अंदाधुंद गोळीबार झाला. त्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर पॅलेस्टिनी असून घटनेनंतर झालेल्या एका चकमकीत त्याचाही खात्मा झाला आहे. (Jerusalem Synagogue Shooting)

पॅलेस्टाईनच्या पश्चिम पट्टीवर नुकताच (26 जानेवारी) इस्रायलने हल्ला चढविला होता. त्यात 9 जण मरण पावले होते. या हल्ल्याचा सूड उगविण्यासाठी हल्लेखोराने सिनेगॉग परिसरात अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. (Jerusalem Synagogue Shooting)

हल्लेखोराची ओळख पटली असून, अलकाम खायरी (वय 21) असे त्याचे नाव आहे. खायरी प्रार्थनास्थळाजवळ पोहोचला. तो प्रार्थना संपण्याची वाट पाहत होता. लोक बाहेर येताच त्याने गोळीबार सुरू केला. यानंतर तो कारमधून पळून गेला. पोलिसांनी प्रार्थनास्थळाचा संपूर्ण परिसर तपासासाठी सील केला आहे. याकोव्हच्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली. बीट हनिनाच्या दिशेने कारमधून जात असताना पोलिसांनी त्याची गाडी थांबवली. त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात खायरी मरण पावला. या चकमकीचा एक व्हिडीओही समोर आला आहे. घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी याकोव्हला भेट दिली. तत्परतेने केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचे त्यांनी कौतुक केले.


अधिक वाचा :

Back to top button