गोर्शकोव्ह युद्धनौका अटलांटिक महासागरात तैनात | पुढारी

गोर्शकोव्ह युद्धनौका अटलांटिक महासागरात तैनात

मॉस्को, वृत्तसंस्था : रशियाने अटलांटिक महासागरात बुधवारी जिरकोन हे हायपरसॉनिक कू्रझ क्षेपणास्त्र असलेली लढाऊ युद्धनौका गोर्शकोव्ह तैनात केली आहे. या माध्यमातून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना अमेरिकेने एक प्रकारचा धोक्याचा इशाराच दिल्याचे बोलले जात आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संरक्षणमंत्री सर्गेई शोयगू आणि या जहाजाचे कमांडर समवेतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गोर्शकोव्ह युद्धनौकेत जिरकोन हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बसविले आहे. हे धोकादायक शस्त्र अन्य देशांकडून रशियाचे रक्षण करेल, अशी मला खात्री असल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. गोर्शकोव्ह युद्धनौका अटलांटिक महासागरातून हिंदी महासागर आणि भूमध्य महासागरातून जाईल, असे सर्गेई यांनी सांगितले.

जिरकोनची वैशिष्ट्ये 

समुद्र आणि जमिनीवर धोकादायक आणि हल्ला करण्याची क्षमता
कोणत्याही क्षेपणास्त्र संरक्षण सिस्टीमला चकवा देऊ शकते
आवाजापेक्षा 9 पट अधिक वेगाची क्षमता
1 हजार किलोमीटर कमी वेळेत पार करू शकते
आण्विक हत्यारे वाहून नेण्याची प्रचंड क्षमता

Back to top button