पाकिस्तान, चीन धार्मिक स्वातंत्र्यासाठी धोकादायक | पुढारी

पाकिस्तान, चीन धार्मिक स्वातंत्र्यासाठी धोकादायक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणार्‍या 11 देशांचा पर्टिक्युलर कन्सर्न (सीपीसी) या यादीत अमेरिकेने पाकिस्तान, चीनसह रशियाचाही समावेश केला आहे. चीन, क्युबा, इरिट्रिया, इराण, निकारागुवा, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा या यादीत समावेश आहे. या देशांतून अन्य धार्मिक गटांना स्वातंत्र्य न मिळणे ही चिंतेची बाब आहे. धर्माच्या आधारावर होणारा भेदभाव आणि अत्याचार थांबवण्यात हे सर्व देश अपयशी ठरले आहेत, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

या संघटना दहशतवादी

अल-शबाब, बोको हराम, हयात तहरीर अल-शाम, हुथी, इसिस-ग्रेटर सहारा, इसिस-पश्चिम आफ्रिका, जमात नुसरत अल-इस्लाम, तालिबान या दहशतवादी संघटना जागतिक शांततेसाठी धोका आहेत, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

जगभरात धर्माच्या आधारावर होणारे अत्याचार संपवण्यासाठी अमेरिका काम करत राहील.
– अँटनी ब्लिंकन
परराष्ट्र मंत्री, अमेरिका

Back to top button