सौदीत 12 जणांना मृत्युदंडाची शिक्षा | पुढारी

सौदीत 12 जणांना मृत्युदंडाची शिक्षा

रियाध : अमली पदार्थांबाबत कठोर धोरण अवलंबत सौदीने गेल्या दहा दिवसांत अमली पदार्थ तस्करीत दोषी 12 जणांचा शिरच्छेद केला. यातील बहुतेक आरोपी विदेशी आहेत.

सौदी अरेबियात इस्लामी कायदे आहेत. बलात्कार, खून, चोरी, अमली पदार्थ यासारख्या गंभीर गुन्ह्यांना कठोर शिक्षा आहे. त्याची वेळोवेळी अंमलबजावणी केली जाते. मागील 10 दिवसांत अमली पदार्थ बाळगणे व विक्री या गुन्ह्यांतील 12 आरोपींचा तलवारीने शिरच्छेद करण्यात आला. ‘टेलिग्राफ’ दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, या 12 जणांमध्ये तीन पाकिस्तानी, चार सीरियन, दोन जॉर्डेनियन आणि तीन सौदी नागरिकांचा समावेश आहे.

Back to top button