Lottery tragedy : कोटीची लॉटरी आणि पत्‍नी प्रियकरासोबत पळाली! ‘त्‍याने’ अनुभवली नियतीची ‘खेळी’…. | पुढारी

Lottery tragedy : कोटीची लॉटरी आणि पत्‍नी प्रियकरासोबत पळाली! 'त्‍याने' अनुभवली नियतीची 'खेळी'....

पुढारी ऑनलाईन ; एका व्यक्‍तीने तब्‍बल १ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. हे सर्व पैसे पतीने आपल्‍या पत्‍नीच्या बँक अकाउंटवर ट्रान्स्‍फर देखील केले. ( Lottery tragedy ) अन् हीच त्‍याच्या जीवनातील सर्वात मोठी चूक ठरली.  जाणून घ्‍या एका बॉलीवूड फिल्‍मलाही लाचवेल अशी गोष्‍ट…

Lottery tragedy : १ कोटी रुपयांची लॉटरली लागली…

प्रत्‍येकाला आयुष्‍यात पैसा हवा असतो. एकदा मोठी बंपर लॉटरी लागावी अशी प्रत्‍येकाची अपेक्षा असते. याच आशेने एकाने लॉटरी काढली आणि त्‍या भाग्‍यवान विजेत्‍याला तब्‍बल १ कोटी रुपयांची लॉटरी लागलीही. त्‍याने लॉटरीत जिंकलेले सर्व पैसे पत्‍नीच्या खात्‍यावर ट्रान्स्‍फर केले. अन् पैसे खात्‍यावर येताच पत्‍नी प्रियकरासोबत पळून गेली. त्‍यामुळे पैसे तर गेलेच शिवाय पत्‍नीही गेली यामुळे या व्यक्‍तीच्या आयुष्‍यात मोठा भूकंपच आला. ही घटना थायलंडमध्ये घडली आहे.

थायलंडच्या इसान प्रांतात राहणारा (४९ वर्षीय) मानित यांनी नोव्हेंबरच्या पहिल्‍या आठवड्यात तब्‍बल १ कोटी ३६ लाख रुपयांची लॉटरी जिंकली. टॅक्‍स कट करून १ कोटी ३० लाख रुपयांपर्यंतची रक्‍कम त्‍यांच्या हाती आली. मात्र हे पैसे आल्‍यावर मानित यांनी त्‍यांची (४५ वर्षीय) पत्‍नी अंगकानारात हीच्या बँक अकाउंटरवर ट्रान्स्‍फर केले.

इतकी मोठी रक्‍कम मिळाल्‍यावर मानित आणि त्‍यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र या आनंदावर विरजन त्‍यावेळी पडले जेंव्हा माानित यांना समजले की, त्‍यांच्या पत्‍नीने जिंकलेली सर्व रक्‍कम घेवून प्रियकरासोबत पोबारा केला आहे. या दोघांच्या लग्‍नाला २६ वर्षे झाली. त्‍यांना तीन मुलेही आहेत. त्‍यामुळे मानित यांना जराही वाटले नव्हते की, त्‍यांची पत्‍नी अंगकानारात ही असे काही करेल. अकाउंट मध्ये पैसे ट्रान्स्‍फर करण्याआधी आणि केल्‍यावरही त्‍यांच्या पत्‍नीचे वर्तन सामान्यच होते. मात्र एक दिवस ती अचानक गायब झाली. यानंतर जेंव्हा खरी गोष्‍ट मानित यांना समजली तेंव्हा मानित यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पतीकडून पोलिसात तक्रार दाखल..

मानित यांनी अंगकानारात आणि तिच्या प्रियकराविरूध्द पोलिस स्‍टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. त्‍यांनी पोलिसांना सांगितले की, मला सर्व ठीक वाटत होते. लॉटरी जिंकल्‍यावर आम्‍ही एका मंदिराला २० लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला होता. एक पार्टीदेखील आयोजित केली होती. ज्‍यामध्ये जवळच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्‍यांना आमंत्रित केले होते. या पार्टीत पत्‍नी अंगकानारासोबत एक अनोळखी व्यक्‍ती देखील आला होता. त्‍या व्यक्‍तीबद्दल विचारल्‍यावर तिने पाहुणा असल्‍याचे सांगितले होते. मात्र नंतर तोच अंगकानारात हिचा प्रियकर निघाला. ज्‍याच्यासोबत ती सर्व पैसे घेवून निघुन गेली. सध्या अंगकानारात हिचा मोबाईल बंद येत आहे.

पोलिसांनी यावर लॉटरीचे पैसे परत करण शक्‍य नसल्‍याचं सांगितलं आहे. कारण बँकेचे अकाउंट हे अंगकानारात हिचे आहे. तिच्या अकाउंटवर स्‍वेच्छेने पैसे भरण्यात आले आहेत. त्‍यात अंगकानारात आणि मानित यांचे कायदेशीररित्‍या लग्‍न झालेले नाही, कारण त्‍यांनी कधीही विवाहाच्या प्रमाणपत्रावर सही केलेली नाही. त्‍यामुळे तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी काहीशी अवस्‍था मानित यांची झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button