Worlds Dirtiest Man Dies | जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीला जबरदस्तीनं घातली आंघोळ अन्... | पुढारी

Worlds Dirtiest Man Dies | जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीला जबरदस्तीनं घातली आंघोळ अन्...

तेहरान : तब्बल 74 वर्षांपासून एकदाही आंघोळ न केल्याने ‘जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती’ (Worlds Dirtiest Man Dies) अशी ओळख निर्माण झालेल्या अमो हाजी या इराणी व्यक्तीचे निधन झाले आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अमो हाजी यांनी मागील साडेसात दशकांमध्ये साधं आपलं तोंडही धुतलेलं नव्हतं. अमो हे 94 वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षापासून एकदाही आंघोळ केली नव्हती. इराणच्या दक्षिणेला असणार्‍या देगाह गावामध्ये अमो राहात होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अमो हे आंघोळ न करण्याची कारणं शोधायचे आणि टाळाटाळ करायचे. नंतर ते आंघोळीशिवाय राहू लागले. त्यांना आंघोळ केल्याने आपण आजारी पडू असे वाटायचे. काही महिन्यांपूर्वीच गावातील लोकांनी अमो यांना बळजबरीने आंघोळ घातली. तेव्हापासून त्यांना प्रकृतीविषयक समस्या जाणवत असल्याचे वाटू लागले. त्यांनी आंघोळ केल्याचा धसका घेतल्याची गावात चर्चा होती. (Worlds Dirtiest Man Dies)

Back to top button