Cyclone Sitrang : ‘सितरंग’ चक्रीवादळाचा बांगलादेशला तडाखा; ५ जणांचा मृत्यू | पुढारी

Cyclone Sitrang : 'सितरंग' चक्रीवादळाचा बांगलादेशला तडाखा; ५ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनालाईन डेस्क : बांगलादेशला सितरंग चक्रीवादळाचा (Cyclone Sitrang) तडाखा बसला आहे. चक्रावादळाशी संबंधित घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बरगुना, नारेल, सिराजगंज आणि भोलाबेट या बेटीय जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. कॉक्स बाजार किनारपट्टीवरून हजारो लोक आणि जनावरांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आज हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि मेघालयमध्ये कहर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बांगलादेशात सोमवारी रात्री झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात सुमारे ५ जणांचा मृत्यू झाला. कॉक्स बाजार शहराचे उपायुक्त मामुनूर रशीद यांनी सांगितले की, सोमवारी किनारपट्टीवरील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, खबरदारी म्हणून, पश्चिम बंगालच्या सखल भागातून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. १०० हून अधिक मदत केंद्रेही सुरू करण्यात आली आहे, आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सोमवारी सकाळी हे चक्रीवादळ सागर बेटाच्या दक्षिणेस सुमारे ३८० किमी अंतरावर घोंघावत होते. दरम्यान, या वादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्रिपुरा, आसाम, मिझाराम, मणिपूर आणि नागालँड या राज्यांना देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँडमध्ये २६ ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्रिपुरा सरकारने २६ ऑक्टोबरला सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

Back to top button