Afaganistan Crisis : तालिबान्यांची चार पानांचे घोषणापत्र जाहीर!!! | पुढारी

Afaganistan Crisis : तालिबान्यांची चार पानांचे घोषणापत्र जाहीर!!!

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : तालिबान्यांनी (Afaganistan Crisis) सरकार स्थापन करण्याबरोबरच आता ४ पानांचे घोषणापत्रही जाहीर केले आहे. हे घोषणापत्र लीडर ऑफ इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान अमीर उल मुमीनिन शेख उल हदीथ हिब्तुल्लाह अखुंदजादाच्या हस्ताक्षरांनी जाहीर करण्यात आले आहे.

सरकारमध्ये सहभागी झालेले सर्व लोक हे इस्लामिक नियम आणि शरिया कायद्यानुसारच काम करणार आहेत आणि देशाला प्रगतीपथावर नेणार आहेत, असे या घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे. लवकरच मंत्रीमंडळातील सर्व सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरूवात करणार आहेत.

वरील घोषणापत्रानुसार अफगाणिस्तानचे सरकार (Afaganistan Crisis) हे इस्लामिक नियमांनुसार आणि शरिया कायद्यानुसार चालणार आहे. मागील २० वर्षांमध्ये तालिबान्यांसमोर दोन ध्येयं होती. १) परकीय सैन्याच्या तावडीतून देशाला स्वतंत्र करणं. २) देशात संपूर्ण स्वांतत्र्य स्थापन करून इस्लामिक व्यवस्था निर्माण करणं, अशी ती ध्येयं होती.

तालिबानी घोषणापत्रात म्हणतात…

आत्मनिर्भर अफगाणिस्तान तयार करणार आहे. शेजारील आणि अन्य देशांशी सन्मानपूर्वक संबंध ठेवू इच्छितो. इस्लामच्या विरोधात नसणारे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद आम्ही मानतो, इस्लामिक नियमांनुसार अल्पसंख्य आणि कमजोर लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणार आहोत. त्याचबरोबर सर्व नागरिकांना समान दर्जा, इस्लामिक अमीरात सर्वांचे इस्लामिक हक्कांची सुरक्षा करणार आहोत.

शरिया कायद्यानुसार धार्मिक आणि आधुनिक विज्ञानाचं शिक्षण दिलं जाईल. आर्थिक विकासासाठी सर्व संसाधनाचा वापर केला जाईल. देशातील बेरोजगारी दूर करून देशाला लवकरच स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. देशातील सर्व नागरिकांना मुलभूत सुविधा त्वरीत प्रयत्न केले जातील. गरिबीचं उच्चाटन आणि राष्ट्रीय संपत्तीची सुरक्षा करण्यात येईल.

माध्यमांचे स्वातंत्र्य आणि दर्जा यामध्ये सुधारणा घडवून आणाला जाईल. तसेच इस्लाम आणि राष्ट्रीय हितासंदर्भात भूमिका ठरवली जाईल. शेजारील आणि इतर देशांना भरोस्याने वागले जाईल. व्यावसिक लोक, विद्वान, प्राध्यापक, डाॅक्टर, शास्त्रज्ञ, अभियंते, सुशिक्षित वर्ग, व्यापारी, या सर्वांना सुरक्षासंदर्भात भरोसा देत आहोत. लोकांनी देश सोडण्याची प्रयत्न करू नये. इस्लामिक अमीरातमध्ये कोणालाही कसलीही अडचण नाही.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील पांडवकालीन सातेरी महादेव मंदिर

Back to top button