हिजाबविरोधी 17 वर्षीय युवतीची इराण पोलिसांकडून तेहरान येथे हत्या | पुढारी

हिजाबविरोधी 17 वर्षीय युवतीची इराण पोलिसांकडून तेहरान येथे हत्या

तेहरान, वृत्तसंस्था : इराण मध्ये हिजाब, बुरखा सक्तीच्या विरोधात निदर्शने सुरूच आहेत. ती दडपण्यासाठी कट्टरवादी सरकारकडून हिंसाचारही सुरूच आहे. ताज्या घटनेत हिजाब, बुरख्याविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करत असलेल्या निका शकरामी या 17 वर्षांच्या युवतीची पोलिसांनी हत्या केली. रविवारी तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

निकाचे नाक कापण्यात आले असून डोक्यावर तब्बल 29 जखमा आहे. निका ही बाजारात आपल्या मित्र मैत्रिणींसह सरकारविरोधात घोषणा देत होती. इराण पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ती निसटली. नंतर तिने एका मित्राला पोलिस तिचा पाठलाग करत असल्याचा फोन केला. निकाच्या कुटुंबीयांनी तिला शोधले. शनिवारी पोलिसांनी निकाच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना दिली.

पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर पळत असताना अपघात झाला, असा बनाव पोलिसांनी रचला. माध्यमांना काही सांगाल तर तुमचीही अशीच अवस्था करू, असा दम पोलिसांनी निकाच्या कुटुंबीयांना दिला. आंदोलनांचे लोण 164 शहरांत पोहोचले आहे. आजवर 92 जणांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button