ED चा मोठा खुलासा; अबुधाबीमधील दरबार रेस्टॉरंट PFI चे मनीलॉन्ड्रिंग सेंटर

ED चा मोठा खुलासा; अबुधाबीमधील दरबार रेस्टॉरंट PFI चे मनीलॉन्ड्रिंग सेंटर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: भारतातील PFI विरोधी सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) देशभरात तपास आणि धाडसत्र सुरू केले आहे. या तपासादरम्यान ईडीने अबुधाबीचे दरबार हे रेस्टॉरंट PFI चे मनी लॉन्ड्रिंग सेंटर असल्याचा मोठा खुलासा केला आहे. पीएफआय संघटनेचे आखाती देशात हजारांहून अधिक कार्यकर्ते आहेत. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात फंड जमा होतो आणि तो भारतात हवालाद्वारे पाठवला जातो, असेही 'ईडी'ने म्हटले आहे.

अबुधाबीवर असा आरोप  की, त्यांनी पीएफआयला १२० कोटींहून अधिक रक्कम ही किरकोळ रक्कम म्हणून या माध्यामातून पाठवली आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की, या प्रकरणात तेजस या वृत्तपत्राने भारत आणि आखाती देशांमधील मुखपत्र म्हणून काम केल्याचे तपासात समोर आले आहे. संस्थेने देणगीच्या खोट्या पावत्या बनवून भारतातील अधिकाऱ्यांची दिशाभूल केली होती.

ईडीने (ED)  म्हटले आहे की, पीएफआयचे अनेक मुख्य सुत्रधार सध्या आमच्या ताब्यात आहेत. ज्यांनी हे कबूल केले आहे की,
अबूधाबीमधील दरबार रेस्टॉरंटचा हवाला व्यवहार आणि भारतात त्यांच्या अवैध हस्तांतरणासाठी सुरक्षित जागा म्हणून वापर केला आहे. अब्दुल रझाक बीपी यांना पीएफआय विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आल्याचे ईडीने उघड केले आहे. दरबार रेस्टॉरंटच्या माध्यमातून पीएफआय आणि संबंधित संस्थांच्या मनी लाँड्रिंग व्यवहारांध्ये संबंधित सूत्रधारांचा सहभाग होता. अबुधाबीमधील दरबार रेस्टॉरंटचे व्यवस्थापकाच्या भावाकडून मनी लाँड्रिंगचे पैसे मिळाल्याचेही ईडीने म्हटले आहे.

ईडीने (ED) गुरुवारी केरळमध्ये अटक केलेल्या शफीक पायथच्या विरोधात रिमांड नोट्सध्ये स्पष्ट केले आहे की, रझाकच्या मालकीची दुसरी कंपनी – तामार इंडिया स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेडदेखील मनी लाँडरिंगसाठी वापरण्यात आले होते. शफीक पायथने 2018 पर्यंत गल्फ थिसस डेली येथे व्यवसाय विकास व्यवस्थापक म्हणून दोन वर्षे काम केले होते. गल्फ थीसेस डेली ही इंटरमीडिया पब्लिशिंग लिमिटेडद्वारा प्रकाशित प्रबंध वृत्तपत्राची एक शाखा आहे. यामध्ये अब्दुल रझाक बीपी हे त्यावेळचे संचालक होते. ED ने उघड केले की पायथ 2007 पासून PFI चे संस्थापक सदस्य होते, ज्याला कतारकडून निधी गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अब्दुल रझाकने हे काम करण्यासाठी अबुधाबीमधील त्याच्या वैयक्तिक नेटवर्कचा वापर केला आणि कथितरित्या दरबार रेस्टॉरंटचे मनी लॉन्ड्रिंग सेंटरमध्ये रूपांतर केले.

या प्रकरणी मोठा खुलासा करताना, तपास यंत्रणा ईडीने (ED) असेही म्हटले आहे की, आखाती देशातील संपूर्ण निधी गोळा करण्याची जबाबदारी ही अशरफवर होती. तो किंगपिन म्हणून सर्व मोठा निधी संकलन आणि हवाला व्यवहार हाताळत असे. तो पीएफआय केरळ राज्य कार्यकारी परिषदेचे सदस्य होता. एर्नाकुलमचे पीएफआय अध्यक्ष म्हणूनही त्या्ने काम केले. 2010 मध्ये प्रोफेसर जोसेफ यांचा शिरच्छेद केल्याच्या खटल्यातही तो आरोपी आहे. अश्रफ पीएफआय तसेच संबंधित संस्थांच्या निधीच्या व्यवहारातही सहभागी होता. अशरफ अबू धाबीमधील दरबार रेस्टॉरंटचा मालक आहे, जे एकेकाळी मनी लॉन्ड्रिंगचे केंद्र होते.

ईडीचे म्हणणे आहे की दरबार रेस्टॉरंटची मालकी, जे मनी लॉन्ड्रिंगचे केंद्र होते, भारतातील अधिकाऱ्यांना उघड केले गेले नाही. त्याचवेळी दरबार रेस्टॉरंटच्या माध्यमातून पीएफआयसाठी मनी लाँड्रिंगची कामे करण्यात अब्दुल रझाक बीपीचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news