Imran Khan : इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा उधळली स्तुतीसुमने; म्हणाले... | पुढारी

Imran Khan : इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा उधळली स्तुतीसुमने; म्हणाले...

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान मोदी यांची कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही; मात्र पाकिस्तानातील अनेक नेत्यांची कोट्यवधींची संपत्ती विदेशात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

इम्रान खान (Imran Khan) म्हणाले, लोकशाही देशातील कोणत्या पंतप्रधानांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे, हे लोकांनी सांगावे. पाकिस्तानातील राजकीय नेत्यांची संपत्तीसह अनेक उद्योग विदेशात आहेत. त्यांच्या मुलांकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे. गरिबांसाठी एक कायदा आणि या लोकांसाठी कायदा वेगळा आहे, असे इम्रान खान म्हणाले.

दरम्यान, सुमारे पाच महिन्यापूर्वीही इम्रान खान (Imran Khan) यांनी भारताचे कौतुक केले होते. भारत आमच्याबरोबरच स्वतंत्र झाला. भारत हा एक स्वाभिमानी देश असून रशियावर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातले असतानाही देशाच्या हितासाठी रशियाकडून भारत इंधन खरेदी करत असल्याचे इम्रान खान म्हणाले होते.


अधिक वाचा :

Back to top button