Haqqani Network : तालिबानी संघटनेत मोठी फूट; मंत्री पदासाठी भांडण | पुढारी

Haqqani Network : तालिबानी संघटनेत मोठी फूट; मंत्री पदासाठी भांडण

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर तालिबानने वर्चस्व मिळवले असले तरी, तालिबान्यांमध्ये वाढत जाणाऱ्या अंतर्गत संघर्षाला मात्र थांबवू शकत नाही. हक्कानी नेटवर्कचा (Haqqani Network) नेता अनस हक्कानी आणि खलील हक्कानीचा तालिबानी नेता मुल्ला बरादर और मुल्ला याकूब यांच्यातील संघर्षाच्या बातम्या आलेल्या होत्या. या संघर्षादरम्यान मुल्ला बरादर यांच्यावर गोळी झाडली गेल्याने जखमी झालेले आहेत.

हक्कानी नेटवर्क (Haqqani Network) हा अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये मोठा वाटा मागत आहे. तसेच त्यांनी रक्षा मंत्री पददेखील मागितलेले आहे. पण, तालिबान ही पदं हक्कानी नेटवर्क देण्यास तयार नाही. याच मुद्द्यांवरून तालिबान्यांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. त्यातून हक्कानी आणि बरादर गटामध्ये संघर्ष झाला. या संघर्षात गोळीबार झाला आणि त्यात बरादर जखमी झाला आहे.
असं असलं तरी, करण्यात आलेल्या दाव्यांची पुष्टी करण्यात आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं आहे की, बरादर सध्या पाकिस्तानात उपचार घेत आहेत. त्यामुळे सरकार स्थापन करणंही टाळण्यात आलं आहे. यापूर्वी तालिबानचे नेतृत्व बरादरच्या हातात जाईल, अशाही बातम्या आलेल्या होत्या.
पाकिस्तानची खेळी…
काही माध्यमांमधून असा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानची इच्छा आहे की, तालिबानी सरकारमध्ये महत्वाची पदं ही हक्कानी नेटवर्कला मिळावीत. त्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या सैन्याला नव्या पद्धतीने उभं करण्याचा प्रयत्न आहे.  त्यामुळे आयएसआयचे प्रमुख फैज हमीद काबूलला गेले. कारण, क्वेटा शूराचे मुल्ला याकूब, मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि हक्कानी नेटवर्क यांच्यामधील मतभेद संपविण्याच्या प्रयत्नात आहेत.

Back to top button