Taliban Crisis : तालिबानच्या प्रवक्त्यांचं वादग्रस्त वक्तव्य | पुढारी

Taliban Crisis : तालिबानच्या प्रवक्त्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : एकीकडे तालिबान (Taliban Crisis) हा भारताशी संवाद साधत आहे, तर दुसरीकडे त्याचे प्रवक्ता काश्मीरच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करत आहेत. तालिबान्यांनी सांगितले की, “आम्हाला जम्मू-काश्मीरसहीत जगातील मुस्लिमांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे.”

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनने वक्तव्य केलं आहे. यापूर्वी तालिबानने म्हंटलं आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावपूर्ण मुद्द्यांमध्ये सहभागी होणार नाही. आणि आमच्या देशाच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाच्या विरोधात होऊ देणार नाही.

एका माध्यमाच्या मुलाखतीत सुहैल शाहीन म्हणाला की, “तालिबानी संघटनेकडे जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर कोणत्याही देशाच्या विरोधात सशस्त्र अभिनान तालिबान चालवणार नाही आम्ही सर्व देशांतील मुस्लिमांकडे समानता स्थापन करण्याची विनंती करणार आहोत”, असे तालिबानच्या प्रवक्ता सुहैर शाहीनने सांगितलं.

भारत आणि तालिबान संवाद

३१ ऑगस्ट रोजी भारताने तालिबान्यांशी (Taliban Crisis) अधिकृत संवाद साधला.त्यामध्ये भारताने विविध विषयांवरील चिंता तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्तनिकजई यांच्याजवळ बोलून दाखवल्या. त्याचबरोबत भारताने असंही सांगितलं की, अफगाणिस्तानची जमीन ही कोणत्याही दहशतावादी संघटनांसाठी आणि भारतविरोधा कारवायांसाठी वापरता कामा नये.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button