
वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका तैवानला सुमारे 1.1 अब्ज डॉलर्सची (सुमारे 8,768 कोटी रुपये) लष्करी मदत देणार आहे. यामध्ये 60 हार्पून अँटिशिप मिसाईल, साईडविंडर मिसाईल, रडार वॉर्निंग सिस्टिम आणि 100 हवेतून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
दोन ऑगस्ट रोजी अमेरिकन प्रवक्त्या नॅन्सी पेलोसी तैवान दौर्यावर गेल्या होत्या. त्यानंतर तैवान सीमेवर चीनकडून लष्करी कारवाया केल्या जात आहेत. चीनच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमेरिकेने तैवानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे चीन संबंध आणखी बिघडले
वॉशिंग्टनमधील चीन दूतावासाने अमेरिकेने हा सौदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तैवानला लष्करी मदत केल्याने अमेरिका आणि चीनचे संबंध आणखी बिघडतील, तसेच अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास चीन सज्ज असल्याचा इशारा चिनी दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यू यांनी दिला आहे.
देशात 7 हजार 219 कोरोनाबाधितांची भर
नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत कोरोना रुग्णसंख्येत 7 हजार 219 ने वाढ झाली असून याच कालावधीत 9 हजार 651 लोक बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याकडून शनिवारी देण्यात आली. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 56 हजार 745 वर आली आहे.गत चोवीस तासांत कोरोनाने 33 लोकांचा बळी गेला. कोरोनाची बाधा झालेल्या लोकांची एकूण संख्या आता 4 कोटी 44 लाख 49 हजार 726 वर गेली आहे. मृतांचा एकूण आकडादेखील वाढून 5 लाख 27 हजार 965 वर पोहोचला आहे.
हार्पून क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
जगातील सर्वात धोकादायक अँटिशिप मिसाईल
* रडारच्या कक्षेत न येता हे पाण्याच्या वरून उड्डाणाची क्षमता
* एका क्षेपणास्त्राचे वजन 691 किलो
* लांबी 12.6 फूट आणि व्यास 13.5 इंच
* कोणत्याही वातावरणात वापर
* सक्रिय रडार गाईडलाईन सिस्टिम
* भारतासह 30 देशांचा लष्करात समावेश