Chinook Helicopter : आग लागण्याच्या जोखिमेमुळे यूएस आर्मीकडून चिनूक हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा ग्राऊंड, भारताने मागितला अहवाल

Chinook Helicopter : आग लागण्याच्या जोखिमेमुळे यूएस आर्मीकडून चिनूक हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा ग्राऊंड, भारताने मागितला अहवाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : यूएस आर्मीने इंजिनमध्ये आग लागण्याची जोखीम असल्याने Chinook Helicopter 'चिनूक हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफ्यातील विमाने ग्राऊंड (लष्करातील उड्डाणे थांबवली) केली आहे. अमेरिकेच्या द वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारताने नुकतेच अमेरिकेकडून अब्जावधी रुपयांचे हे 'चिनुक हेलिकॉप्टर' खरेदी केले आहे. जे सध्या लष्करात कार्यरत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाने अमेरिकेकडून या घटनेचा संपूर्ण अहवाल मागविला आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने अत्यंत सावधगिरीने, असे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. अधिका-यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले की, यूएस आर्मीला Chinook Helicopter हेलिकॉप्टरमधील इंजिनमध्ये कमी प्रमाणात आग लागल्याची माहिती होती आणि या घटनांमुळे कोणतीही दुखापत किंवा मृत्यू झाला नाही.

जर्नलने म्हटले आहे की, "अलिकडच्या दिवसांत आग लागल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले." यूएस आर्मी मटेरिअल कमांडने भरपूर सावधगिरी बाळगून शेकडो हेलिकॉप्टरच्या ताफ्याला ग्राउंड (लष्करी सेवा थांबवली) केले." तथापि, अधिका-यांचे 70 हून अधिक विमानांकडे लक्ष आहे. ज्यामध्ये ही समस्या प्रामुख्याने असण्याचा संशय आहे, असे अधिकाऱ्यांनी दैनिकाला सांगितले.

हेवी-लिफ्ट चिनूक हेलिकॉप्टरच्या ग्राउंडिंगमुळे (लष्करी सेवा थांबवल्यामुळे) अमेरिकन सैनिकांसाठी लॉजिस्टिक आव्हाने निर्माण होऊ शकतात. मात्र, ही सेवा किती काळ थांबवण्यात येते यावर हे अवलंबून आहे, असे जर्नलने म्हटले आहे.

भारताच्यादृष्टीने या घटनेचे महत्व

भारताकडे जवळपास 15 CH-47 चिनूक हेलिकॉप्टर आहेत. जे भारताने अमेरिकेकडून अब्जावधी रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, ते लडाख आणि सियाचीन हिमनद्यासारख्या ठिकाणी एअरलिफ्ट ऑपरेशन्ससाठी प्रमुख लष्करी साधनांपैकी एक म्हणून उदयास आले आहेत. जे या प्रदेशांमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याला मदत करतात.

भारताला फेब्रुवारी 2019 मध्ये चिनूक हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली. बोईंगने 2020 मध्ये भारतीय हवाई दलाला 15 चिनूक हेलिकॉप्टरची डिलिव्हरी पूर्ण केली.

चिनूक हेलिकॉप्टरचा भारतीय ताफा उत्तरेकडील ऑपरेशन्ससाठी चंदीगडच्या बाहेर आहे तर ईशान्येकडील भागांची काळजी घेण्यासाठी दुसरे युनिट आसाममध्ये आहे. भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरचा ताफा अजूनही कार्यरत आहे.

त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर " भारताने यूएस आर्मीच्या चिनूक सीएच-47 हेलिकॉप्टरच्या संपूर्ण ताफ्याला इंजिनमध्ये आग लागण्याच्या जोखमीमुळे ग्राउंडिंग (लष्करी सेवा थांबवण्याच्या) करण्याच्या कारणांचा तपशील मागवला आहे," असे सरकारी अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news