भारत - तालिबान चर्चा प्रथमच; तालिबानी म्हणाले हे हवेच आहे | पुढारी

भारत - तालिबान चर्चा प्रथमच; तालिबानी म्हणाले हे हवेच आहे

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत-तालिबान चर्चा झाली असून ‘अफगाणिस्तान भूमीच्या आमच्याविरोधात वापर करू नये,’ अशी भूमिका भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबान्यांसमोर मांडली. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची भेट झाली. यावेळी भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या मायदेशात परतण्याच्या मुद्द्यांवर महत्त्वाची चर्चा झाली.

तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांनी मित्तल यांच्याशी चर्चा केली.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताचे तालिबानशी संबंध कसे असतील? यावर चर्चा होत होती.

गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशांनी तालिबानसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारत – तालिबान चर्चा झाली असून तालिबानला काही सूचना केल्या आहेत.

भारताची भूमिका काय असेल याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. या पार्श्वभूमीवर भारताची चर्चा सध्या चर्चेचा विषय आहे.

अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. ज्यांना भारतात यायचे आहे, त्यांना सुरक्षित पोहचविले जाईल, असेही सांगितले.

अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा भारताविरोधात कुठल्याही दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ नये, हा मुद्दाही मित्तल यांनी चर्चेत उपस्थित केला.

यावर तालिबानच्या प्रतिनिधीने अशी कोणतीही कृती होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. भारताचे सर्व मुद्दे सकारात्मक मार्गाने सोडवले जातील, असेही ते म्हणाले.

मथुरा नगरीत मांस, मद्य विक्रीवर बंदी; योगी आदित्यनाथ यांची घोषणा

पत्नीपीडित म्हणाला, पत्नीपासून मला वाचवा, अन्यथा मी मरतो

‘भारतासोबत चांगले संबंध हवेत’

भारतासोबत आम्हाला चांगले संबंध हवे आहेत, असे वक्तव्य तालिबानचा वरिष्ठ नेता शेह मोहम्मद अब्बास स्टेनकझई यांनी सांगितले.

अब्बास यांनी डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले आहे.

तालिबान भारतासोबत अफगाणिस्तानचे राजतैनिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध कायम ठेवण्याची इच्छा आहे, असेही स्पष्ट केले.

Back to top button