शाहिद आफ्रिदी म्‍हणाला, तालिबानमध्‍ये सकारात्‍मक बदल | पुढारी

शाहिद आफ्रिदी म्‍हणाला, तालिबानमध्‍ये सकारात्‍मक बदल

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन डेस्‍क  पाकिस्‍तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने  तालिबानबाबत भाष्‍य केले आहे.  तालिबानमध्‍ये अनेक सकारात्‍मक बदल दिसून येत आहेत. तालिबान महिलांना काम करू देत आहे. क्रिकेटलाही पसंती देत आहे, असे शाहिद आफ्रिदी याने म्‍हटले आहे.

आफ्रिदीकडून तालिबानची स्‍तुती

शाहिद आफ्रिदी म्‍हणाला की, तालिबान यावेळी खुल्‍या मानसिकतेतून आला आहे.

या गोष्‍टी पूर्वी तालिबान मध्ये दिसून येत नव्हत्‍या. महिलांना काम करण्यासाठी, राजकारणात येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

तालिबान क्रिकेटला समर्थन देत आहे. श्रीलंकेमधील परिस्‍थितीमुळे यावेळी सीरीज झाली नाही, मात्र तालिबान क्रिकेटला समर्थन देत असल्‍याचे दिसून येत आहे.

आफ्रिदीने तालिबान संबंधी खुलेपणाने सकारात्‍मक विधान केले आहे.

जम्‍मू काश्मीरच्या मुद्यावरही अनेकवेळा त्‍याने विवादास्‍पद विधाने केली आहेत.

पाकव्याप्त काश्मीर मध्ये आयोजित होणाऱ्या क्रिकेट प्रिमिअर लिगलाही आफ्रिदीने पाठिंबा दिला होता.

पाकिस्‍तान नेहमीच तालिबानची तळी उचलतो. माजी क्रिकेटपट्‍टू आणि  पाकिस्‍तानचे पंतप्रधान यांनी देखील सत्‍तेत येण्याआधी तालिबानचे समर्थन केले होते. सध्या पंतप्रधान पदावर विराजमान असतानाही त्‍यांनी तालिबानचे समर्थन केले आहे.

दुसरीकडे तालिबानी कमांडरने पाकिस्‍तान हे आपले दूसरे घर असल्‍याचे सांगितले आहे. इतकच काय भारत-पाकिस्‍तानने आपले वाद आपापसात मिटवावेत. यामध्ये अफगाणीस्‍तानला उगाच मध्ये खेचू नये, असे म्‍हटले होते.

हेही वाचलं का ? 

Back to top button