ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा विमानतळावर गोळीबार, सर्व उड्डाणे थांबवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा (Canberra Airport) विमानतळावर आज (दि.१४) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्व उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर टर्मिनल खाली करण्यात आले आहे. या घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणांनी विमानतळाचा (Canberra Airport) ताबा घेतला असून कडक बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सुदैवाने गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अटक केलेल्या व्यक्तीने गोळीबार का केला याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, कॅनबेरा विमानतळाचे टर्मिनल खबरदारी म्हणून रिकामे करण्यात आले आहे. विमानतळावरील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे व्यवस्थापनाने सांगितले आहे.

प्रवासी अॅलिसन यांनी या घटनेबाबत सांगितले की, जेव्हा गोळीबाराची घटना घडली, तेव्हा तिने तिच्या बॅग सुरक्षा तपासणीमध्ये ठेवल्या होत्या. आम्ही रांगेत होतो आणि पहिल्या बंदुकीच्या गोळ्या ऐकल्या. मी मागे वळून पाहिले आणि तिथे एक माणूस पिस्तूल घेऊन उभा होता. त्यानंतर कोणीतरी ओरडले खाली उतरा, खाली उतरा आणि आम्ही तिथून पळत सुटलो.

हेही वाचलंत का ? 

Exit mobile version