Google : गुगल डेटा सेंटरमध्ये शॉर्टसर्किट; तीनजण गंभीर जखमी | पुढारी

Google : गुगल डेटा सेंटरमध्ये शॉर्टसर्किट; तीनजण गंभीर जखमी

पुढारी ऑनलाईन: अमेरिकेतील कौन्सिल ब्लफ्स येथील गुगलच्या डेटा सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटने स्फोट झाला. रॉयटर्सच्या माहितीनुसार, या स्फोटात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार अकरा वाजता घडली. डेटा सेंटर इमारतीजवळ असलेल्या सबस्टेशनवर तीन इलेक्ट्रिशियन काम करत असताना, अचानक विद्युत स्फोट झाला. यामध्ये तिघे इलेक्ट्रिशियन गंभीररित्या भाजले गेले.

‘रॉयटर्स’ वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या अहवालानुसार, गंभीर जखमी कर्मचार्‍याला व्यक्तीला हेलिकॉप्टरने नेब्रास्का मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. तर इतर दोघांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे. आयोवा-नेब्रास्का सीमेवर बसलेल्या कौन्सिल ब्लफ्सपासून नेब्रास्का मेडिकल सेंटर  हाकेच्या अंतरावर आहे.

गुगलची जगभरात एकूण 23 डेटा केंद्रे

गुगल डेटा सेंटरमध्ये मोठमोठे ड्राईव्ह, कॉम्प्युटरचे शेल्फ, अंतर्गत आणि बाह्य नेटवर्क सुविधा, कूलिंग व्यवस्था आणि विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचा एक मोठा गुंता असलेला परिसर आहे. जगभरात विविध ठिकाणी गुगलचे डेटा सेंटरचे जाळे पसरले आहे. Google ची अमेरिकेतमध्ये 14, तर जगभरात एकूण 23 डेटा केंद्रे आहेत. डेटा केंद्रे “Google ची सर्व उत्पादने आणि सेवा 24 तास नियंत्रित ठेवतात,” कंपनीच्या म्हणण्यानुसार. कौन्सिल ब्लफ्स  साइट Google च्या सर्वात मोठ्या ठिकाणांपैकी एक आहे. ते 200९ मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आले आहे.  भारतातील मुंबई येथे Google चे डेटा सेंटर आहे.

हेही वाचा :

Back to top button