पत्नीचा 35 लाखांचा विमा काढला अन् केली हत्या | पुढारी

पत्नीचा 35 लाखांचा विमा काढला अन् केली हत्या

भोपाळ; वृत्तसंस्था : कर्जबाजारी पतीने पत्नीचा 35 लाखांचा विमा काढला आणि त्यानंतर तिची हत्या केल्याची खळबजनक घटना उत्तर प्रदेशातील राजगडमध्ये घडली. पाच लाखांची सुपारी देऊन पत्नीची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. 26 जून रोजी पूजा वीणा या महिलेची गोळ्या झाडून हत्या केली होती.

पोलिस चौकशीत कट रचणारा दुसरा कोणी नसून तिचा पती बद्रीप्रसाद असल्याचे समोर आले. या प्रकरणात आपल्या मावस भावाला त्याने अडकावण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान बद्रीप्रसादवर 40 ते 50 लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्याने पत्नी पूजा वीणाचा 35 लाखांचा विमा काढला. ही रक्कम मिळविण्यासाठी त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने काही गुन्हेगारांना पाच लाखांची सुपारी दिली. दरम्यान, बद्रीप्रसादने विम्याची रक्कम लवकरात लवकर कशी मिळेल यासाठी इंटरनेेट आणि यू-ट्यूबवर माहिती घेतली. कोणत्या मार्गाने पैसा मिळेल, याची तो खातरजमा करत होता. त्यानंतर बद्रीप्रसादाने पाच लाखांचे कर्ज घेतले आणि पत्नीच्या हत्येची सुपारी दिली.

Back to top button