चीनकडून आता नॅन्सी यांच्या बदनामीची मोहीम | पुढारी

चीनकडून आता नॅन्सी यांच्या बदनामीची मोहीम

बीजिंग; वृत्तसंस्था : तैवान दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नॅन्सी आपल्या तरुणपणी एका चिनी युवकासह या फोटोत दिसत आहेत. नॅन्सी यांनी चिनी युवकाशी लग्न केले होते, अशा वावड्या या उठविल्या जात आहेत. फॅक्ट चेकमध्ये अनेकांनी हा दावा खोटा ठरवला आहे.

नॅन्सी यांची बदनामी करण्यासाठी चीन सरकारच्या प्रायोजित सोशल मीडिया खात्यांवरून हा फोटो मुद्दाम व्हायरल केला जात आहे. चीनविरोधी भूमिकेमुळे नॅन्सी यांच्यावर जिनपिंग सरकारचा राग आहे. यातूनच त्यांच्या बदनामीची ही मोहीम चीनने सुरू केली आहे.

Back to top button