Sri Lanka : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

Sri Lanka : रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
Published on
Updated on

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेतील (Sri Lanka) राष्ट्रपती निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) विजयी झाले आहेत. श्रीलंकेतील हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळून गेल्यानंतर राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज संसदेत पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले आहेत. देश अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. आमच्यासमोर मोठी आव्हाने आहेत, असे नवनियुक्त राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.

आज बुधवारी श्रीलंकेच्या संसदेत झालेल्या मतदानात विक्रमसिंघे यांनी प्रतिस्पर्धी दुल्लस अलाहापेरुमा यांचा १३४ विरुद्ध ८२ मतांनी पराभव केला. २२५ सदस्यांच्या संसदेत ४ मते अवैध ठरवण्यात आली. २ खासदार मतदानावेळी गैरहजर राहिले. तर २१९ वैध मते होती.

गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेल्यानंतर विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम सांभाळले. आता त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पार पाडतील.

श्रीलंकेकडे (Sri Lanka) अन्न, शेतीसाठी खते आणि इंधन यासारख्या मूलभूत गरजांच्या आयातीसाठी पैशांची मोठी टंचाई आहे. यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्दशने सुरु आहेत. गोटाबाया राजपक्षे यांनी वाढत्या निदर्शनांदरम्यान देश सोडून मालदीवमध्ये पलायन केले. त्यानंतर ते सिंगापूरमध्ये गेले.

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी (state of emergency)  जाहीर करण्यात आली. जोपर्यंत राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलक राष्ट्रपती भवनातच ठाण मांडून राहतील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यानंतर गोटाबाया यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news