Europe heatwave : उष्णतेच्या लाटेने युरोप होरपळला! स्पेन आणि पोर्तुगालमध्ये १,७०० हून अधिक जणांचा बळी

Europe heatwave : उष्णतेच्या लाटेने युरोप होरपळला! स्पेन आणि पोर्तुगालमध्ये १,७०० हून अधिक जणांचा बळी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : संपूर्ण युरोपमध्ये (Europe heatwave) तापमानाने उच्चांक गाठला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे युरोपमध्ये सुमारे १,७०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. पोर्तुगालमध्ये सर्वाधिक १ हजारहून अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद केली आहे. मंगळवारी पहिल्यांदाच ब्रिटनमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. ब्रिटनमधील लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नद्या, जलाशयांत आंघोळीसाठी उतरत आहे. यामुळे ब्रिटनमध्ये पाचजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. युरोपीय देशांत अनेक ठिकाणी जंगलांत वणवा पेटला असून यामुळे मोठी हानी झाली आहे.

स्पेनमध्ये १० जुलै ते १७ जुलै या कालावधीत उष्णतेमुळे ६७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. पोर्तुगालच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की ७ जुलै ते १८ जुलै दरम्यान उष्णतेमुळे १,०६३ मृत्यू झाले आहेत. दरम्यान, युरोपमधील उष्णतेची लाट (Europe heatwave) शिगेला पोहोचली आहे. तापमान आणखी एक आठवडा सरासरीपेक्षा जास्त राहू शकते, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेने (WMO) व्यक्त केला आहे.

फ्रान्समध्ये अतिउष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नेदरलँड्समध्ये जुलै महिन्यात विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन आणि ग्रीसमधील जंगलात वणवा पेटला असून या भीषण आगीमुळे हजारो लोकांना त्यांची घरे सोडून सुरक्षितस्थळी जावे लागले आहे.

स्पेनच्या उत्तर-पश्चिम झामोरा प्रदेशातील जंगलाला लागलेल्या आगीमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर पोर्तुगालमध्ये आगीपासून वाचण्याच्या प्रयत्नात एका वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेल्जियमच्या दक्षिणेकडे तसेच पश्चिम आणि नैऋत्य जर्मनीमध्ये पारा ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वायव्येकडील लोसासिओ येथील जंगलाला आग लागल्याने एका अग्निशामकाचा मृत्यू झाला. तर एका ६९ वर्षीय मेंढपाळाचा मृतदेह जंगलात आढळून आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news