थरारक! बोटीसमोर महाकाय व्हेल माशाची उडी | पुढारी

थरारक! बोटीसमोर महाकाय व्हेल माशाची उडी

पुढारी आॅनलाईन डेस्क : व्हेल माशाची उडी : ऑस्ट्रेलियातील हंपबॅक व्हेल माशाचं दर्शन व्हावे यासाठी बरेच पर्यटक समुद्रात भटकंती करत असतात. प्रत्येकवेळी व्हेल माशाचं दर्शन होईलच याची काही खात्री नसते. मात्र ऑस्ट्रेलियातील काही पर्यटकांना या महाकाय व्हेलचं दर्शन झालं आहे. परदेशातील माध्यमांत या व्हेलचा फोटो सध्या व्हायरल झालेला आहे.

या राक्षसी माशाने नुकतेच दर्शन दिले असे नाही तर बोटीच्या समोर उडी घेतल्याने पर्यटकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. ही घटना ऑस्ट्रेलियातील बोंडी येथील समुद्रात घडली आहे.

काही पर्यटक व्हेल माशाच्या दर्शनासाठी समुद्रात गेले होते, त्यावेळी हा महाकाय मासा समुद्रात दिसला. काही क्षणात या माशांने चक्क बोटीवरून उडी घेतली. हा क्षण बोटीतील पर्यटकांनी कॅमेराबद्धही केला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button