Srilanka Emergency : अखेर श्रीलंकेने हटवली आणीबाणी | पुढारी

Srilanka Emergency : अखेर श्रीलंकेने हटवली आणीबाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंका सरकारने देशात लागू केलेली आणीबाणी हटवली आहे. देशावर ओढवलेले आर्थिक संकट आणि सरकार विरोधात होत असलेल्या आंदोलनानंतर दोन आठवड्यांपूर्वी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. श्रीलंका सरकारने देशात लागू केलेली आणीबाणी शनिवारी (दि. २१) रोजी हटवली आहे. (Srilanka Emergency)

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ६ मे ला एका महिन्यात दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर केली होती. श्रीलंकेच्या राष्ट्रपती सचिवालयाने म्हटले आहे की, शुक्रवारी मध्यरात्री पासून आणीबाणी हटवण्यात आली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेत सुधार होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी महागाई वाढल्याने अनेक राजकीय नेत्यांची घरे देखील जाळण्यात आली होती.

श्रीलंकेत सरकारचे समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला तर २०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. श्रीलंकेला १९४८ साली इंग्रजांपासून स्वातंत्र मिळाले. त्यानंतर श्रीलंका सध्या सर्वांत मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे.(Srilanka Emergency)

हेही वाचलंत का?

Back to top button