अमेरिकेने ११ धोकादायक देशातील विस्थापितांवरची बंदी हटवली   | पुढारी

अमेरिकेने ११ धोकादायक देशातील विस्थापितांवरची बंदी हटवली  

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

ट्रम्प प्रशासनाने ११ देशातील विस्थापितांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घातली होती. आता ही बंदी प्रशासनाने उठवली आहे. पण, या देशातील विस्थापितांना अधिक कडक सुरक्षा चाचणीतून जावे लागणार आहे.

अती धोकादायक ११ देशातील विस्थापितांना अमेरिकेत येताना बऱ्याच सुरक्षा मानकांमधून यावे लागणार आहे. या बाबत होमलँड सुरक्षा सेक्रेटरी क्रिस्टजेन निलसेन म्हणाल्या ‘अतिरिक्त सुरक्षा मानकांमुळे या विस्थापित उपक्रमाचा गैरफायदा घेवून अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करणे कठीण होणार आहे. आम्ही सुरक्षेच्या बाबतीत कोणताही धोका पत्करणार नाही.’  

अमेरिकेने जरी या ११ देशातील विस्थापितांना प्रवेश दिला असला तरी या कडक सुरक्षा मानकांमुळे त्यांचे अमेरिकेत येणे तितके सहज राहणार नाही.

Back to top button