रशियामध्ये हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर ते बेपत्ता झाल्याची माहितीसमोर आली आहे. हे हेलिकॉप्टर शनिवारी (दि.31) सुदूर पूर्व द्वीपकल्प कामचटका येथे उड्डाण करत असताना बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन क्रू मेंबर्ससह एकूण 22 जण होते. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्यामाहितीनुसार, हेलिकॉप्टर वाचकाझेट्स ज्वालामुखीजवळ उड्डाण करत असताना ते बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरच्या शोधासाठी आता दुसरे विमान पाठवण्यात आले आहे.
एमआय-8 हे 1960 च्या दशकात डिझाइन केलेले डबल इंजिन हेलिकॉप्टर आहे. हे रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्या ठिकाणी याचा वापर केला जातो. रशियन लष्कराने 1967 मध्ये पहिल्यांदा या हेलिकॉप्टरचा वापर केला होता. त्याची किंमत 125 कोटी रुपये आहे. एआय-8 टी हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरपैकी एक आहे. भारत, चीन, इराणसह ५० हून अधिक देश नागरी आणि लष्करी कारणांसाठी याचा वापर करतात. भारताने पहिल्यांदा 1971 मध्ये रशियाकडून एमआय-8 हेलिकॉप्टर खरेदी केले होते. त्यानंतर 1988 पर्यंत भारताने लष्करी वापरासाठी एकूण 107 एमआय-8 हेलिकॉप्टर खरेदी केले.
रशियन वृत्तसंस्थेने सांगितले की, रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या एमआय-8 टी हेलिकॉप्टरने बचाव पथकांसह शोधकार्य सुरू केले. वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि हवाई वाहतूक चालवल्याप्रकरणी या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रशियन हेलिकॉप्टर ज्या भागातून गायब झाले त्या भागात रिमझिम पाऊस आणि धुके दिसल्याचे सांगितले जात आहे.
या वर्षी जानेवारी महिन्यात रशियाची राजधानी मॉस्को येथून आणखी एक विमान अफगाणिस्तानसाठी रवाना झाले होते. आणि विमान कोसळले होते, ज्यामध्ये केवळ चार जण बचावले होते. रशियन विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की हे विमान थायलंडमधील उतापाओ विमानतळावरून आलेली चार्टर्ड रुग्णवाहिका होती. या विमानाची निर्मिती फ्रान्समध्ये करण्यात आली होती.