अमेरिकेत पाकिस्तानी पंतप्रधानांची कपडे उतरवून तपासणी | पुढारी

अमेरिकेत पाकिस्तानी पंतप्रधानांची कपडे उतरवून तपासणी

न्यूयॉर्क :  पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अमेरिकेमध्ये  अपमानाकारक वागणूक मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहिद खाकान अब्बासी यांची अमेरिकेच्या जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर  कडेकोट सुरक्षा तपासणी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रवाशांप्रमाणे त्यांना कपडे उतरवण्यास सांगण्यात आले. अमेरिकेतील विमानतळावर पाकिस्तान पंतप्रधानांना मिळालेल्या या वागणूकीमुळे पाकिस्तानात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची देखील पाकिस्तान विमानतळावर अशाच प्रकारे तपासणी करावी, अशा संतप्त प्रतिक्रिया या प्रकारानंतर उमटत आहेत.   

पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कमधील जॉन एफ कॅनेडी एअरपोर्टवर  शाहिद खाकान अब्बासी यांची सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प सरकारकडून पाकिस्तानवर व्हिसा बंदीसंदर्भात विचारविनिमय सुरू असताना हा प्रकार समोर आल्यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण वाढले आहे.   

पाकचे पंतप्रधान अब्बासीआजारी बहिणीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. यावेळी हा सर्व प्रकार घडला.  पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. अब्बासी यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. खासगी  खासगी दौऱ्यामध्ये त्यांची अशापद्धतीने तपासणी होणे हा देशाचा अपमान असल्याचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत अशा प्रकारची तपासणी करण्याचा प्रकार नवीन नाही. यापूर्वी भारताचा बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची तीनवेळा अशा प्रकारे तपासणी झाली होती.

Tags : Pakistan, Pakistan PM,  Shahid Khaqan Abbasi, JFK Airport, New York, America

Back to top button