चहा विकून ‘ती’ बनली लखपती! | पुढारी

चहा विकून ‘ती’ बनली लखपती!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

शाळा शिकून मोठे व्हा, नाहीतर आमच्यासारखेच चहा विकावा लागेल. चहा विकून कोणी लखपती होत नाही.  असा उपदेश अनेक चहाचा गाडा चालवणारे पालक आपल्या मुलांना करत असतात. पण, अमेरिकेतील एका तरूणीने चहा विकून लखपती होण्याची कामगिरी करून दाखवली आहे. ब्रुक इडी असे त्या तरूणीचे नाव असून चहा विक्रीतून तीने सात मिलीयन डॉलर्स कमवले आहेत.

ब्रुक इडी ही अमेरिकन चहासाठी वेडी असणारी तरूणी २००२ मध्ये भारतात आली होती. तिने इथे चहा घेतला आणि चहाने अक्षरश: तीला वेड लावले. अमेरिकेत परतल्यानंतर २००७ मध्ये इडीने स्वत:ची चहा बिझनेस सुरू केली. आज २०१८ मध्ये इडीला तिच्या कंपनीतून सात मिलीयन डॉलर्स इतका फायदा होतो. इडीने तिच्या या कंपनीला ‘भक्ती चाय’ असे भारतीय भाषेतील नाव दिले आहे. 

इडी भारतात आली होती त्यावेळी तिने चहा या भारतीय पेयाची चव घेतली. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याने इडीने अनेक ठिकाणच्या चहाची चव चाखली. आले घातलेला आणि गवती चहाचा तीने आस्वाद घेतला. यानंतर इडी २००६ मध्ये पुन्हा अमेरिकेत परतली. कोलोरॅडोमधील अनेक कॅफेजमध्ये इडीने चहाची चव शोधली पण, तीने भारतात पिलेल्या चहाची चव तिथल्या कोणत्याही पेयामध्ये तीला मिळाली नाही.  चहाची चव मिस करत असलेल्या इडीने ‘भक्ती’ नावाची चहा तयार करणारी कंपनी सुरू करण्याचा निश्चय केला. यासाठी ती पुन्हा एकदा भारतात आली. इथे राहून चहा कसा बनवायचा हे पाहून ती पुन्हा अमेरिकेत परतली. खरतर अमेरिकेत परतताना ती तिचे स्वप्नच घेऊन परतत होती.

इडीने एकाच वर्षात ‘भक्ती चाय’ने स्वत:ची वेबसाईट लॉन्च केली. काहीच दिवसात इडीची भक्ती चाय कंपनी उदयास आली. इडी दोन जुळ्या मुलांची आई असून तीने पूर्ण वेळ असणारी नोकरी सोडून चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. इडी चहा  विकण्यासाठी कप किंवा ग्लासचा नाही तर काचेच्या बरण्या आणि बाटल्यांचा वापर करते. यापूर्वी कधीही चहाची चव न चाखणाऱ्यांना हा ‘देसी’ टच प्रचंड भावला.  इडीला २०१४ मध्ये ‘इंटरप्रेन्युअर ऑफ दि इअर’ पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. 


Tags : Millionaire,  american, woman,chai business, brook eddy, Indian Tea,   

Back to top button