किम जोंग-मून जे इन यांची भेट | पुढारी

किम जोंग-मून जे इन यांची भेट

प्यांगयाग :

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष  मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले.  ही भेट दोन्ही देशाच्या सीमेवरील डिमिलिट्रायज झोनवर झाली. आण्विक क्षेपणास्त्र चाचण्या घेऊन जगभरात खळबळ उडवून देणार्‍या किम जोंग यांना रोखण्यासाठी अमेरिकेने दबाव टाकला होता.

मात्र, जोंग यांनी थेट अमेरिकेवरच हल्ल्याची धमकी दिली होती.  ही बैठक म्हणजे नव्या इतिहासाची सुरुवात आहे. आम्ही शांती प्रस्थापित करणारा नवा आध्याय सुरू करत आहोत, असे किम जोंग यांनी या बैठकीनंतर व्यक्‍त केले.

Tags : Kim Jong-un,Moon Jae in, visit,

Back to top button