भारत-चीन सीमेवर शांतता राखली जाईल  | पुढारी

भारत-चीन सीमेवर शांतता राखली जाईल 

बीजिंगः पुढारी ऑनलाईन

आज चीनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. दोघांच्यामध्ये झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले की, भारत आणि चीनच्या सीमाप्रश्नाविषयी निपक्षपातीपणे तोडगा काढण्यासाठी एका विशेष प्रतिनिधीची निवड केली जाईल याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे.

भारत-चीन सीमेवर वातावरण चांगले राहण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केले जातील. जगातील वातावरण शांत राहण्यासाठी दोन्ही देशांच्याकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील. दोन्ही देशांनी दहशतवादाचा जाहीर निषेध केला आहे. दहशतवादाविषयी दोघांनी मिळून कारवाई करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले असल्याचे सचिव गोखले यांनी सांगितले. 

Tags : pm modi, china tour, press conference, Foreign Secretary, Vijay Gokhale

Back to top button