२६\११ हल्ला : पाकच्या सरकारी वकिलांची उचलबांगडी | पुढारी

२६\११ हल्ला : पाकच्या सरकारी वकिलांची उचलबांगडी

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन 

नऊ वर्षापासून प्रलंबित असलेल्या २६\११ च्या पाकिस्तान मधील न्यायालयात सुरु असलेल्या केसला वेगळे वळण लागले आहे. पाकिस्तान सरकारने या केसमधील सरकारी वकिलांची उचलबांगडी केली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार सरकारच्या म्हणण्यानूसार सरकारी वकील काम करत नसल्याने त्यांना हटवण्यात आले.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला २६\११ केससंदर्भात भारताला संपूर्ण सहकार्य केरण्याची सूचना केली होती. अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी ‘ २६\११ च्या केसमध्ये न्यायदानाच्या प्रतिक्षेत आहोत. आम्ही पाकिस्तानला या केसमध्ये सहकार्य करण्याची विनंती करत आहोत.’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पाकने त्याच्या बरोबर  उलटी कृती करत सुरुवातीपासून या केसचे काम पाहणारे सरकारी वकील चौधरी अझर यांची उचलबांगडी केली आहे. पाकने ही करावाई अझर हे सरकारला अपेक्षित असलेल्या पध्दतीने केसचे काम करत नाहीत महणून केली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी चौधरी अझर यांनी ‘मला या केसचे काम थाबवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी इथून पुढे या केसवर काम करणार नाही. माझ्याकडून ही केस का काढून घेतली याचे कारण मला सांगण्यात आलेले नाही. गृह मंत्रालयाने ही रुटिन प्रक्रिया आहे असे उत्तर दिले आहे. पण मी गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी मला कोणत्या कारणास्तव काम थांबवायला सांगितले याची विचरणा करणार आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.

यावर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वरिष्ठ सरकारी वकील उज्वल निकम  म्हणाले, ‘पाकिस्तानने मुख्य सरकारी वकीलांची उचलबांगडी केल्याने पाकला दहशतवाद्यांना पाठीशी घालायचे आहे हे स्पष्ट होते.’  मुंबई हल्याची केस अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. भारताने प्रमुख आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे दिले असतानाही हाफीस सईद सारखे मुख्य सुत्रधार गेली दहा वर्ष मोकाट फिरत आहेत.  

Back to top button