दहशतवादाच्या मुद्यावर भारत इंडोनेशियाच्या पाठीशी : मोदी | पुढारी

दहशतवादाच्या मुद्यावर भारत इंडोनेशियाच्या पाठीशी : मोदी

जकार्ता : पुढारी ऑनलाईन 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पंतप्रधान इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये पोहचले. यावेळी इंडोनेशियामधील भारतीयांनी विशेषतः लहान मुलांनाी मोदींचे जोरदार स्वागत केले. 

पंतप्रधान मोदींनी ॲक्ट ईस्ट पॉलिसीला बळ देण्यासाठी  इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर  या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते या देशांबरोबर द्विपक्षीय संबध मजबूत करण्यावर भर देतील. त्याचबरोबर गुंतवणूक आणि व्यापाराबाबतही या देशांबरोबर चर्चा होणार आहे.  

आज सकाळी मोदींचे इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आगमन झाले.  इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी इंडोनेशियातील भारतीय वंशाच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. याच्यात लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. पंतप्रधान मोदींनी या लहान मुलांची भेट घेतली. 

दरम्यान, नरेंद्र मोदींनी शिष्टमंडळाच्या बैठकीत बोलताना इंडोनेशियात झालेल्या दहशतवादी हल्याची निंदा केली. ते म्हणाले ‘भारत इंडोनेशियात झालेल्या दहशतवादी हल्याची निंदा करतो, भारत दहशतवादाविरुध्द लढणाऱ्या इंडोनेशियाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील.’ त्यानंतर त्यांनी  ‘भारत – आसियान ही नवी शक्ती आहे, यामुळे इंडो – पॅसिफिक भागातच नाही तर सर्वाच भागात शांततेची हमी मिळेल.’ असे वक्तव्य केले. मोदींनी इंडो – पॅसिफिक भागाचा विकासाबाबत हा भारत आणि इंडोनेशियाचा दृष्टीकोण सारखाच असल्याचे आपल्या भाषणादरम्यान सांगितले.    

Tags : narendra modi  tour of three countries, Indonesia Malaysia & Singapore, PM modi reach in Indonesia,  Jakarta,  president of Indonesia Joko Widodo

Back to top button