‘कोणी घर नेता का घर’; अमेरिकन पोलिसांची फेसबुक पोस्ट | पुढारी

‘कोणी घर नेता का घर’; अमेरिकन पोलिसांची फेसबुक पोस्ट

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

मराठीतील ‘नटसम्राट’या नाटकातील ‘कोणी घर देता का घर’ हा डायलॉग प्रसिद्ध आहे. हाच डायलॉग थोड्या वेगळ्या अंदाजात अमेरिकेतील पोलिसांना वापरण्याची गरज पडली आहे. एका व्यक्तीने केलेल्या आगाऊपणामुळे पोलिसांना ‘कोणी घर नेता का घर’ असे म्हणावे लागले. 

त्याचे झाले असे की, अमेरिकेतील डेलावेअरची राजधानी असलेल्या डोवर येथे एका व्यक्तीने त्याचे घर रस्त्यावरच सोडून पलायन केले. तुम्ही म्हणाल असे कसे काय.  घर हलवता येते का? परदेशात तुम्ही तुमचे घर उचलून इतरत्र हलवण्याची सुविधा असते. तर एका व्यक्तीने त्याचे घर हलवले पण ते रस्त्यातच टाकून तो पसार झाला. 

डोवर येथील पोलिसांनी ‘या’ घराच्या मालकाला शोधण्यासाठी फेसबुकचा वापर करण्याचे ठरवले. ‘कोणीतरी आपले घर असे रस्त्यावर सोडून गेले आहे. ही चेष्टा नव्हे’ असे ट्विट पोलिसांनी केले. 

‘अतिरीक्त भार’ असलेले हे घर आहे असा बोर्ड या घराबाहेर टांगलेला आहे. हे घर जादा क्षमतेचे असलेने त्याला हलवणे शक्य नाही. या घरामुळे कोणालाही त्रास होणार नाही अशा जागेचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या पोस्टला ११ हजार शेअर्स मिळाले असून हजारांच्यावर कमेंट आल्या आहेत. 

Back to top button